IT Raid On Yashwant Jadhav | NCP च्या मलिकांनंतर आता शिवसेनेवर निशाणा ! मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर ‘आयकर’चा छापा, 5 ठिकाणी ‘रेड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  IT Raid On Yashwant Jadhav | सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते (NCP Leader) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांना अटक (Arrest) केल्यानंतर आता तपास यंत्रणांनी शिवसेनेकडे (Shivsena) आपला मोर्चा वळविला आहे. शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापा (IT Raid On Yashwant Jadhav) घातला असून मुंबईत वेगवेगळ्या ५ ठिकाणी हे छापे घालण्यात आले आहेत.

 

आघाडीतील एक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे नेत्यांनी यापूर्वी केलेल्या तक्रारीवरुन आयकर विभागाने (Income Tax Department) आज सकाळी शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Shiv Sena Standing Committee Chairman Yashwant Jadhav) यांच्या घरावर छापा (IT Raid) घातला. सकाळी ७ वाजल्यापासून त्यांच्या घरात सर्च सुरु आहे.

 

यशवंत जाधव (IT Raid On Yashwant Jadhav) यांचे मुंबईतील बलार्ड पिअर भागात निवासस्थान आहे. या ठिकाणी सकाळी ७ वाजता आयकर विभागाचे पथक पोहचले. त्यांच्याबरोबर सीआरपीएफचा (CRPF) बंदोबस्त होता. त्यांनी आल्या आल्या घरात सर्च करण्यास सुरुवात केली आहे. गेली दोन तासाहून अधिक काळ ही तपासणी सुरु आहे.

 

 

 

Advt.

यशवंत जाधव यांनी प्रधान डिलर्स प्रायव्हेट लि. (Pradhan Dealers Pvt.Ltd.)
या कंपनीच्या नावे १५ कोटींची मनी लॉड्रिंग (Money laundering) केल्याचे
आयटीच्या तपासणी अहवालात समोर आल्याचा आरोप आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष असल्यापासून टेंडरच्या माध्यमातून हा पैसा फिरवण्यात आला.

 

२०११ – १२ मध्ये उदय महावर (Uday Mahavar) या व्यक्तीने प्रधान डिलर्स नावाची कंपनी बनवली होती.
त्यात पैसे जमवले. त्यानंतर ही कंपनी जाधव कुटुंबाला विकली होती.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections 2019)
यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र दाखल (Affidavit filed) केले होते.
त्यात ७.५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती देण्यात आली होती.
त्यात २.७४ कोटींची स्थावर मालमत्ता होती, तर आमदार यामिनी जाधव (MLA Yamini Jadhav)
यांचे पती यशवंत जाधव यांच्याकडे ४.५९ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगण्यात आले होते.
त्यात १.७२ कोटींची स्थावर मालमत्ता होती. कोलकत्ता (Kolkata) येथील शेल कंपन्यांद्वारे (Shell Company)
काही आर्थिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले. त्यात यामिनी जाधव व त्यांचे पती
आणि कुटुंबाने पैसे कमविले असल्याचा आरोप करण्यात आला होता.

 

Web Title :- IT Raid On Yashwant Jadhav | Income Tax department searches premises of Shiv Sena corporator and Standing Committee chairperson of BMC, Yashwant Jadhav Mumbai News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा