सरकार बदलण्याची वेळ आली आहे : राधाकृष्ण विखे पाटील

लातूर : पोलीसनामा

देशात आणि राज्यात भाजप सरकार आल्यापासून शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झाली आहे. महागाई, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक ओढाताण होऊ लागली आहे. त्यामुळे हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेणापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना केले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची वाढती लोकप्रियता भाजपसाठी धोक्याची घंटा 
[amazon_link asins=’B01JOKVSIE,B01HQ4O058′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5e8ad19a-b8b4-11e8-9067-c5f62c88f743′]

शेतकऱ्यांना विक्रमी भाव देणाऱ्या रेणापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप देशमुख यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विखे पाटील बोलत होते. या कार्यक्रमात सरकारवर तोफ डागताना विखे पाटील म्हणाले, या सरकारने दूध दराचा प्रश्न ताटकळत ठेवला आहे. हमीभावावरुन बाजार समित्यांचे कामकाज बंद पडले आहे. इंधनाचे दर वाढत आहेत. या सर्व प्रश्नांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता सरकार बदलण्याची वेळ आहे.
[amazon_link asins=’B07G9JQZTV,B07D5CP4V7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’651921ed-b8b4-11e8-853f-614c7031b0c6′]
दिलीप देशमुख यांचा गौरव करताना विखे पाटील म्हणाले, कारखानदारी अडचणीत असताना विलासरावांनी  मांजरा कारखाना उभा केला. दिलीप देशमुख यांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत काम केले. या सोहळ्यास आमदार अमित देशमुख, अशोक पाटील निलंगेकर, आमदार बसवराज पाटील आदी उपस्थित होते.