जेजुरीत यंदा शिखर काठ्यांचा जल्लोष नाही ! कोरोनामुळे यात्रा रद्द

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीमध्ये आज शिखर काठ्यांची यात्रा संपन्न झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी भरणारी माघ पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे जेजुरीत शिखरी काठ्यांचा जल्लोष पाहायला मिळाला नाही. जेजुरीची यात्रा फक्त संगमनेरकर होलम आणि सुपेकर खैरे आणि स्थानिक होळकर यांच्या फक्त मानाच्या एकाच काठीने करण्यात आली. सकाळी संगमनेरकर होलम आणि दुपारी सुपेकर खैरे आणि स्थानिक होळकर यांच्या शिखरी काठ्यांनी मोजक्याच भाविकांच्या येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात हि यात्रा संपन्न झाली. प्रत्येक काठीसोबत फक्त १० जणांना प्रवेश देण्यात आला आहोत.

दरवर्षी जेजुरीमध्ये माघ पौर्णिमेनिमित्त हि यात्रा भरवण्यात येते. या यात्रेला राज्यभरातून लाखो भाविक येत असतात. हि यात्रा २ दिवस भरत असते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा प्रशासनाकडून हि यात्रा रद्द करण्यात आली होती. यंदा हि यात्रा रद्द करण्यात आली असली तरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होणारा शिखरी काठ्यांचा पारंपरिक देवभेटीचा सोहळा मोजक्याच भाविकांच्या स्वरूपात संपन्न झाला. पोलिसांकडून सुद्धा यात्रेच्या कालावधीत चार पोलीस अधिकारी आणि ५० पोलीस कर्मचारी यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जेजुरीकरांकडून प्रशासनाला देण्यात आलेल्या प्रतिसादामुळे हि यात्रा शांततेत पार पडली.