Jalgaon Crime | दुर्दैवी ! शाळेत जाताना दोन सख्ख्या भावांना बसनं चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची मृत्यूशी संघर्ष

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शाळेत निघालेल्या दोन सख्ख्या भावंडांना खासगी बसने चिरडल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यात (Jalgaon Crime) घडली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon Crime) जामनेर तालुक्यातील देऊळगाव (Deulgaon Jamner taluka) येथे आज (शनिवार) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी खासगी वाहनाची तोडफोड केली.

 

आर्यन नसीब तडवी Aryan Nasib Tadvi (वय-3) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर त्याचा मोठा भाऊ रिहान Rihan Naseeb Tadvi (वय-5) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बुलडाणा येथे उपचार सुरु आहेत. आपघाताची माहिती मिळताच पाहुर पोलीस ठाण्यातील (Pahur Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी (Jalgaon Crime) संतप्त झालेल्या ग्रामस्थांना शांत करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

 

 

धामणगाव बढे बसस्थानकावरुन शनिवारी बालाजी ट्रॅव्हल्स (Balaji Travels) ही खासगी बस (एमएच 21 बीएच 0647) प्रवाशांना घेऊन जामनेरच्या दिशेने निघाली होती. मात्र वाटेत देऊळागाव गुजरी येथे रस्त्याने शाळेत पायी जात असलेल्या रिहान आणि आर्यन या दोन भावांना बसची धडक बसली. यामध्ये दोन्ही भावंडे चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारासाठी बुलढाणा येथे घेऊन जात असताना आर्यनचा वाटेत मृत्यू झाला. तर रिहानची प्रकृती गंभीर (critical condition) असून उपचार सुरु आहेत.

 

अपघातानंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण घनवटे (Police Inspector Arun Ghanwate)
यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच पाचोरा येथून अतिरिक्त पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले.
या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.
दरम्यान, पोलिसांनी बस चालक आणि क्लिनरला जमावाच्या तावडीतून सुरक्षीत बाहेर काढून ताब्यात घेतले.

 

Web Title :- Jalgaon Crime | private bus accident one of the two brothers died the other was in critical condition in hospital Pahur Police Station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा