Life Insurance | लाईफ इन्श्युरन्स घेताना कधीही करू नका ‘ही’ चूक, मिळणार नाही ‘क्लेम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Life Insurance | इन्श्युरन्सचा उल्लेख येताच आयुर्विमा म्हणजे लाईफ इन्श्युरन्स (Life Insurance) आठवतो. बहुतांश लोक विमा गुंतवणुक म्हणून घेतात. भविष्यातील आर्थिक गरजा लक्षात घेता लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी घेतात. हे खरे आहे की इन्श्युरन्स आपल्या बचतीचाच एक भाग आहे. परंतु याकडे गुंतवणूक म्हणून पाहू नये.

 

याशिवाय बहुतांश लोक लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी (life insurance policy) स्वत च्या फायद्याच्या हिशेबाने घेतात. तर जीवन विम्याचा पॉलिसी होल्डरला थेट क्वचितच काही लाभ होत असेल. होय, पॉलिसी होल्डरवर अवलंबून लोकांच्या भल्यासाठी तो घेतला जातो. आपल्या पश्चात लाईफ इन्श्युरन्स (Life Insurance) आपल्यावर अवलंबित लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात मदत करतो.

 

विमा कंपन्या असा रोखतात क्लेम
नेहमी अशी प्रकरणे पहायला मिळतात की वेळेवर प्रीमियम भरून सुद्धा लाईफ इन्श्युरन्सचे फायदे पॉलिसी होल्डरच्या कुटुंबियांना मिळू शकत नाहीत. विमा कंपन्या काही ना काही कमतरता सांगून विशेषता पॉलिसी होल्डरची चूक सांगून क्लेम रोखतात.

 

दोघांमध्येही खुलेपणा असावा
यासाठी कोणत्याही कंपनीकडून लाईफ इन्श्युरन्स घेताना कंपनी आणि पॉलिसी होल्डरमध्ये काहीही लपलेले नसावे. कंपनीने आपल्या पॉलिसीचे सर्व फायदे, टर्म कंडीशन इत्यादी बाबत सविस्तर सांगितले पाहिजे. हाच खुलेपणा पॉलिसी होल्डरचा कंपनी सोबत असायला हवा. आपला आजार किंवा सवयींबाबत स्पष्ट चर्चा केली पाहिजे.

 

पूर्ण माहिती द्या, अन्यथा हेतूच निष्पळ ठरतो
अनेक लोक जास्त प्रीमियमपासून वाचण्यासाठी विमा कंपनीला पूर्ण माहिती देत नाहीत. अशाप्रकारच्या चूकांमुळे इन्शुरन्स कंपन्या क्लेम फेटाळतात. यामुळे पॉलिसी खरेदी करण्याचा पूर्ण हेतूच निष्पळ ठरतो.

 

टर्म इन्श्युरन्सवर द्या लक्ष (Term Insurance Plan)
प्रत्येकाला वाटते की, त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाला कोणतीही समस्या येऊ नये, यासाठी व्यक्ती अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करतो. जर पॉलिसी होल्डरला आपल्या कुटुंबाबाबत कोणतीही जोखीम घ्यायची नसेल तर त्याने टर्म इन्श्युरन्स आवश्य घेतला पाहिजे.

 

टर्म इन्श्युरन्सचा हेतू
बहुतांश लोक टर्म इन्श्युरन्सला वायफळ खर्च समजतात. मात्र, कोरोना महामारीनंतर लोकांना टर्म इन्श्युरन्सचे महत्व समजले आहे. आपल्यातील अनेक लोक टर्म इन्श्युरन्स खरेदी करणे टाळण्यामागील कारण सांगतात की, इतर इन्श्युरन्समध्ये लाईफ कव्हरचा समावेश आहे. टर्म इन्श्युरन्सचा हेतूच पॉलिसी होल्डरच्या नंतर कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे आहे.

कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी टर्म इन्श्युरन्स
यासाठी ज्या प्रकारे आपण कुटुंबासाठी घर बांधतो, मुलांना चांगले शिक्षण देतो,
त्याच प्रमाणे भविष्यात कोणत्याही अप्रिय घटनेच्या स्थितीत कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी टर्म इन्श्युरन्स अवश्य घेतला पाहिजे.

 

तर प्रीमियम कमी होईल
टर्म लाईफ इन्श्युरन्स जेवढ लवकर घ्याल तेवढाच प्रीमियम (Insurance Premium) कमी असेल.
हा घेण्यास जेवढा उशीर कराल तेवढाच महाग होत जाईल.

 

योग्य माहिती द्या
लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी (life insurance policy) घेताना विमा कंपनीला आपल्यावर अवलंबित लोकांची योग्य माहिती दिली पाहिजे.
जर विमा कंपनीला तुमच्यावर अवलंबित लोकांबाबत योग्य माहिती नसेल तर क्लेम मिळवण्यात अडचण येईल.

 

Web Title :- Life Insurance | life insurance policy plans term insurance plan premium

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ahmednagar Crime | शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल; ‘आधी अश्लील मेसेज पाठवले अन्…’

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, शताब्दी आणि दुरंतो ट्रेनमध्ये मिळेल फ्रेश फूड, जाणून घ्या डिटेल

Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांकडून नारायणगाव, भिगवण, शिरुर, ओतुर परिसरात छापे ! 9 लाखांचा गांजा व गांजाची झाडे जप्त, 6 जणांना अटक