Homeक्राईम स्टोरीJalgaon Crime | धक्कादायक ! सासू अन् सासर्‍याच्या छळाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

Jalgaon Crime | धक्कादायक ! सासू अन् सासर्‍याच्या छळाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन –  Jalgaon Crime | जळगावमध्ये (Jalgaon) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने सासू- सासऱ्याच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Jalgaon Crime) केली आहे. हि घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या तरुणाने व्हॉट्स अपवर आत्महत्येचा स्टेटस ठेवला होता. त्याच्या व्हॉट्स अप स्टेटसवरून त्याने पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या मृत तरुणाचे नाव अमोल प्रकाश धनगर (Amol Prakash Dhangar) असे आहे. अमोल याचा बकरी विक्रीचा व्यवसाय होता. त्यातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.

 

अमोल हा शिरसोली जळके रोडवरील भोलेनाथ नगरमधील बकऱ्यांच्या शेडमध्येच रोज रात्री झोपत असे.
पण घटनेच्या रात्री त्याने वडील प्रकाश धनगर यांना शेडमध्ये झोपण्यास पाठवले आणि तो स्वतः घरी झोपला.
रविवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास वडील प्रकाश धनगर (Prakash Dhangar) हे घरी आले तेव्हा अमोलने छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास (Crime News) घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी (Police Patil Shrikrishna Bari) यांनी मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे (Medical Officer Dr.Renuka Bhangale) यांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. (Jalgaon Crime)

यावेळी त्यांना अमोलच्या खिशात सुसाईड नोट (Suicide Note) आढळली. या सुसाईड नोट मध्ये त्यांनी सासू- सासऱ्यांच्या धमक्या व छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे.
अमोल यांच्या माघारी मुलगा, मुलगी, पत्नी, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आज मी माझी जीवनयात्रा संपवत आहे.
कारण माझी सासूबाई आणि सासरा मला फार त्रास देतात आणि फोन वरती धमकी देतात. म्हणून मी माझी जीवन यात्रा संपवत आहे.
त्याच्यावर कठोर कारवाई करा, ही नम्र विनंती. माझा बकरीचा व्यवसाय आहे.
त्या बकऱ्या विकून जे पैसे येतील ते पैसे माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या नावावर टाकावे.
जेणेकरून त्यांना पुढे काही अडचण येणार नाही, ही माझी शेवटची इच्छा आहे., असे त्याने सुसाईड नाेटमध्‍ये लिहले आहे.

 

Web Title : Jalgaon Crime | Shocking! Young man commits suicide after being harassed by his mother-in-law

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | चॉकलेटच्या आमिषानं 4 वर्षाच्या मुलीवर 12 वर्षाच्या मुलाकडून लैंगिक अत्याचार

Long Weekends 2022 | ‘या’ तारखांना येतील 2022 मधील ‘लाँग वीकेंड’, ऑगस्टमध्ये तर सुट्ट्याच-सुट्ट्या

Mouni Roy | मौनी रॉय झाली ‘Oops Moment’ची शिकार, बॅकलेस ड्रेस घालून कारमध्ये बसताना झाली कॅमेरामध्ये कैद..! पाहा व्हायरल व्हिडिओ 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News