एकनाथ खडसे यांना ‘कोरोना’ची बाधा !

जळगावः  पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे (ncp-leader-and-former-minister-eknath-khadse-corona-positive) यांना कोरोनाची बाधा झाली आहे. उपचारासाठी ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार आपण घेणार आहोत, असे खडसे यांनी म्हटले आहे. यावेळी, माझ्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत कुणीही माझ्या भेटीसाठी येऊ नये, असे आवाहनही खडसे यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि त्यांच्या मुलीलाही करोनाची लागण झाली आहे. रोहिणी खडसे यांनी स्वतःच यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली होती. त्यांची प्रकृती बरी असून त्या खबरदारी म्हणून रुग्णालयातच आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आपल्या हातात बांधले आहे.