Jalyukt Shivar Yojana | ‘जलयुक्त शिवार योजनेला क्लिन चीट’, सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवाराला (Jalyukt Shivar Yojana) महाविकास आघाडी सरकारकडून क्लीन चिट देण्यात आल्याचं वृत्त प्रकाशीत झाले. यावर आता राज्य सरकारने स्पष्टीकरण देत म्हटले की, जलयुक्त शिवार योजनेला सरकारची क्लीन चिट देण्यात आलेली नाहीये. (No clean chit to Jalyukt Shivar Yojana)

राज्य सरकारचे स्पष्टीकरण
जलयुक्त शिवार योजनेला (Jalyukt Shivar Yojana)  क्लीन चिट दिल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राज्य सरकारने यावर सप्टीकरण देताना म्हटले की, 27 ऑक्टोबर 2021 रोजी मृद व जलसंधारण विभागाच्या (Water Resources Department) मुख्य सचिवांची लोकलेखा समिती समोर साक्ष होती. त्यावेळी सचिवांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे सदर बातमी प्रस्तृत करण्यात आली आहे. मात्र CAG ने उपस्थित केलेल्या मुद्यांवर सचिवांनी आपली साक्ष नोंदविलेली आहे व ही आकडेवारी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने स्वत: दिलेली आहे. या समितीचे अध्यक्ष भाजप आमदार सुधिर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आहेत.

चौकशीसाठी SIT ची नेमणूक
या अभिनायाची सविस्तर चौकशी करण्यासाठी शासनाने  SIT नेमलेली आहे.
त्याप्रमाणे सुमारे 71 टक्के कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर एसआयटीच्या अहवालाप्रमाणे शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) चौकशीचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी एसआयटी च्या निकषाप्रमाणे चौकशी अहवाल सादर केलेला नाही.
ही सर्व चौकशी चालू असताना शासनाने जलयुक्त शिवार अभियानाला क्लीन चिट देण्याचा प्रश्न येत नाही.

 

Web Title :- Jalyukt shivar yojana | maharashtra government clarify that there is no clean chit to jalyukt shivar yojana

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

former Indonesian President Sukarno | इण्डोनेशियाचे संस्थापक राष्ट्रपती सुकर्णो यांची कन्या इस्लाम सोडून स्वीकारणार हिंदू धर्म, जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्येचा देश

Sameer Wankhede | पाय खोलात ! वानखेडेंना दुहेरी दणका; NCB नं चौकशी सुरु करण्यापूर्वीच अडचणीत वाढ

Ration | रेशन कार्डवाल्यांना मोफत धान्यासह आता Free मिळेल ‘डाळ’, ‘तेल’ आणि ‘मीठ’ ! जाणून घ्या सरकारचा प्लान