home page top 1

मुंबईच्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिस सईदला ‘टेरर फंडिंग’च्या केसमध्ये अटक

नवी दिल्ली : वृत्‍तसंस्था – कुख्यात दहशतवादी आणि मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यासह इतर अनेक हल्ल्यांचा मास्टर माइंड हाफिस सईदला पाकिस्तानातील लाहोर येथे अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या म्हणण्यानुसार सईला टेटर फंडिंगच्या केसमध्ये अटक करण्यात आली आहे.

हाफिज सईला अटक करण्यासाठी भारतासह इतर अनेक अमेरिका आणि इतर देशांचा पाकिस्तानवर प्रंचड दबाव होता. पाकिस्तानी मिडीयानुसार सईदला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये 26/11 ला दहशतवादी हल्‍ला झाला होता. तपास यंत्रणांनी हल्‍ला करणार्‍यांपैकी एक कसाबला जिवंत पकडले होते. त्याच्याकडे तपास केल्यानंतर हाफिस सईद हा पाकिस्तानात बसुन त्यांना सूचना देत असल्याचे कसाबने कबुल केले होते. न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. मात्र, मुंबईच्या हल्ल्यामध्ये हाफिस सईदचा सहभाग होता असे निष्पनन झाले.

गेल्या अनेक दिवसांपासुन पाकिस्तावर भारतासह इतर देशांचा प्रचंड दबाव होता. अखेर आज (बुधवार) हाफिस सईदला लाहोर येथुन अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like