Jammu And Kashmir Encounter | जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये सुरक्षा दलांनी केला 3 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : वृत्तसंस्था – Jammu And Kashmir Encounter | जम्मू-काश्मीरमधील बडगाममधील जोलवा भागात गुरुवारी रात्री सुरक्षा दलांनी (Security Force) शोध आणि घेरा बंदी मोहीम राबवली होती. त्यावेळी दहशतवादी (Terrorist) आणि सुरक्षा दलात चकमक झाली. यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान (Enocunter) घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. दरम्यान, आयजीपी काश्मीर यांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळ्यांसह अनेक आपत्तिजनक साहित्य जप्त करण्यात आले आहे. (Jammu And Kashmir Encounter)

 

https://twitter.com/ANI/status/1479332221794226176?s=20

बुधवारी पुलवामामध्ये चकमक –

पुलवामामध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी लपले होते त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम राबवली. त्यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचे हे तिघे सदस्य होते.त्यातील एक जण पाकिस्तानी नागरिक होता. यावेळीही शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली. सुरक्षा यंत्रणांनी चांदगाममध्ये शोध मोहीम राबवली. ज्या ठिकाणी दहशतवादी लपले होते त्या ठिकाणाला घेराव घालत दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्यामुळे, प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनीही गोळीबार (Firing) केला. त्यात तिघांचाही खात्मा झाला अशी माहिती काश्मीर पोलिसांनी (Kashmir Police) दिली आहे. (Jammu And Kashmir Encounter)

पोलीस महानिरीक्षक विजय कुमार (IG Vijay Kumar) म्हणाले की, ‘गेल्या पाच दिवसातील ही पाचवी कारवाई आहे. गुरुवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. त्यातील एक पाकिस्तानी नागरिक असून त्यांच्याकडून दोन एम-4 कार्बाइन्स आणि एक एके-47 रायफल आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वीच दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये जवानांनी नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, असेही त्यांनी सांगितले.

Web Title : Jammu And Kashmir Encounter | 3 terrorists killed encounter security forces jks budgam jammu kashmir

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे, केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत; जाणून घ्या कमतरतेची लक्षणे