गांधी जयंती निमित्‍त मोदी सरकारचा मोठा निर्णय ! जम्मूच्या नेत्यांवरील नजरबंदी हटवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गांधी जयंतीचे औचित्य साधत जम्मू प्रशासनाने एवढ्या दिवस नजर कैदेत ठेवलेल्या जम्मूतील नेत्यांना मुक्त केले आहे. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर प्रशासनाने अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवले होते. डोगरा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष चौधरी लाला सिंह यांना देखील नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

जम्मूत नजरकैदेत ठेवलेल्या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांवरील कैद हटवण्यात आली आहे. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स, कांग्रेस, पॅंथर्स पार्टीच्या नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांना 5 ऑगस्ट पासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

5 ऑगस्ट रोजी कलम 370 रद्द करण्यात आपले होते. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव काही स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यांची सुटका करण्यात आलेली आहे. फक्त जम्मूत नाही तर काश्मीरच्या देखील अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. यात माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला यांच्या बरोबर अनेक नेत्यांचा समावेश होता. नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी सरकारने विरोधी नेत्यांना कैद केले असल्याचे सांगितले होते.

आता मात्र काश्मिरातील परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे प्रशासनाने नजर कैदेत ठेवलेल्या नेत्यांना गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे.

Visit : policenama.com