भाजप सरकारनं देशाचं ‘डोकं’ कापलं, देशाचा विश्‍वासघात केला : काँग्रेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करून जम्मू काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशात विभागण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर कॉंग्रेसने जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘भाजपा सरकारने देशाचे डोकेच कापले आहे आणि भारताचा विश्वासघात केला आहे.’ ‘चीन आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या या संवेदनशील राज्याचा सरकारने अक्षरश: खेळ मांडला आहे. आमच्या पक्षासह अन्य पक्षही या गोष्टीचा कडाडून विरोध करतील,’ असा निर्धार राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केला.

जम्मू-काश्मीरसारख्या सीमावर्ती राज्यात तेथील जनतेच्या पाठिंब्याशिवाय फक्त सैन्याच्या बळावर शत्रूशी लढता येऊ शकत नाही. जम्मू-काश्मीरसाठी लाखो लोकांनी बलिदान दिलं आहे. तेथील जनता, सुरक्षा दलांचे जवान आणि मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांनी वेळोवेळी दहशतवादाचा सामना केला आहे, असेही आझाद म्हणाले.
‘कलम ३७० मुळे काश्मीर एका धाग्यात बांधलं गेलं होतं. पण भाजप सरकारने सत्तेच्या धुंदीत आणि मते मिळवण्यासाठी राज्यातील तीन-चार बाबी एका झटक्यात रद्द केल्या. भारताच्या इतिहासात हे काळ्या अक्षरांनी लिहिलं जाईल. सरकारनं कलम ३७० रद्द केलं, तसंच राज्याचं विभाजनही केलं. आता काश्मीरमध्ये नायब राज्यपाल असतील. एनडीए सरकार या थरापर्यंत जाईल आणि जम्मू-काश्मीरचं अस्तित्वच संपवून टाकेल असा विचार स्वप्नात सुद्धा केला नव्हता,’ असंही गुलाब नबी आझाद म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त