सीमेवर कुरापती सुरूच , त्रालमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा 

श्रीनगर : वृत्तसंस्था – भारत पाक सीमेवर दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. जम्मू -काश्मीरच्या त्रालमध्ये आज पहाटेपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर शोध मोहीम सुरु करण्यात आली. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या संदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

दरम्यान सर्जिकल स्ट्राईक नंतर सीमेपल्याडून दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. रविवारी ३ मार्च रोजी देखील दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. मात्र, दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले असून , नऊ जवान जखमी झाले होते. या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन कर्मचारी शहीद झाले आहेत. तर नऊ जवान जखमी झाले असून यामध्ये दोन सीआरपीएफचे जवान आहेत. आणि सात लष्कराचे जवान आहेत. ही चकमक जम्मू काश्मीरमधल्या हंदवाडा येथे झाली होती .

Loading...
You might also like