पाकिस्तानचा कट उधळला, तब्बल 100 कोटींच्या ड्रग्ससोबत मोठी रक्कम जप्त

हिंदवाडा : वृत्तसंस्था – मागच्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर मध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी गोधळ घातला होता. आता हिंदवाडा पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांकडून लाखो रुपये, ड्रग्स आणि काही सामान ताब्यात घेतले आहे. ही जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठी कारवाई असल्याचेही सांगितले जात आहे. पोलिसांनी तीन दहशतवादी अटक केले असून ते हॅन्डलरच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी बाजारात १०० कोटी रुपये किंमत असलेले २१ किलो हेरॉईन, पैसे आणि काही इतर सामान जप्त केले आहे. लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी ड्रग्स पुरवण्याचे काम करत होते.

हे ड्रग्स विकून जे पैसे येत असत त्यातून दहशतवाद्यांना आर्थिक मदत केली जात असल्याची माहिती मिळत आहे. तसेच अटक केलेले तिघे पाकिस्तानमधील दहशतवादी हॅन्डलरच्या संपर्कात असल्याची देखील माहिती समोर येत आहे. हिंदवाडाच्या एसपींनी माहिती दिली की, हे तिघे लष्कर-ए-तोयबासाठी काम करत होते.