‘लॉकडाऊन’ दरम्यान नाही होत कोर्स पुर्ण, आता रेडिओ क्लासेसमुळं होईल मदत, जाणून घ्या

श्रीनगर : मोबाईल इंटरनेट सेवेतील अडचणी आणि काही घरांमध्ये स्मार्टफोन नसल्याने जम्मू आणि काश्मीर शिक्षा विभागाने मोठा उपक्रम सुरू केला आहे. रेडिओ वर्ग सुरू करण्याच्या उपक्रमाने डोडा जिल्ह्यात विद्यार्थ्यांना कोरोनो व्हायरस लॉकडाऊन सुरू असूनही आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यात मदत केली आहे.

ऑल इंडिया रेडिओचे स्थानिक स्टेशन – एयर भाद्रवाह, जे जवळपास संपूर्ण डोडा जिल्ह्याला कव्हर करते, 29 मेपासून लागोपाठ 101 मेगाहर्टझवर प्रतिदिन दिड तासांचा वर्ग प्रसारित करत आहे. जे विद्यार्थी आणि पालक जे कमी उत्पन्न गटातील आहे आणि ग्रामीण भागात राहून खासगी ट्यूशन लावू शकत नाहीत, ते मार्चमध्ये लॉकडाऊनमुळे मोठ्या कालाधीसाठी शाळा बंद झाल्याने चिंताग्रस्त झाले होते.

विद्यार्थ्यांसाठी अधिकार्‍यांनी 27 मार्चपासून ऑनलाईन वर्ग सुरू केले होते आणि जिल्ह्याच्या सर्व शाळांना याच्याशी जोडले होते. जेव्हा शिक्षण विभागाने माहिती घेऊन आकडे काढले तेव्हा समजले की, जिल्ह्यातील केवळ 55 टक्के विद्यार्थ्यांकडेच इंटरनेट आणि स्मार्टफोन सेवा आहे. म्हणजे 63,406 मधून केवळ 37,837 विद्यार्थीच या वर्गांशी जोडलेले राहिले आहेत.

यासाठी प्रसार भारतीला विनंती करण्यात आली की, त्यांनी एआयआर भद्रवाहवर टाइम स्लॉट द्यावा. परवानगी मिळाल्यानंतर 9वी ते 12वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 29 मेपासून दैनिक आभासी रेडिओ वर्ग सुरू करण्यात आला आहे.