‘जन्नत’ स्टार सोनल चौहानचे आता ‘या’ विश्वात पदार्पण

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची स्टार अभिनेत्री सोनल चौहान ही अभिनेत्री त्याचबरोबर चांगली गायिका सुद्धा आहे. भारतात ती सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोनल ने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपट ‘जन्नत’ पासून केली होती. याचित्रपटात ती प्रसिद्ध अभिनेता इमरान हाशमी याच्या सोबत काम केले होते. सोनलने हिंदी चित्रपटात व्यतिरिक्त दक्षिण भारत चित्रपटात देखील काम केले आहे. त्याचबरोबर ती चांगली गायिका आहे.

‘जन्नत’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली ही अभिनेत्री सोनल चौहान वेब विश्वात पदार्पण करत आहे. ‘स्काई फायर’ असे या वेब सीरीजचे नाव असून या सीरीजमध्ये ती डी-ग्लॅम लूकमध्ये दिसणार आहे. मॉडेलिंगमध्ये ओळख निर्माण करणाऱ्या या अभिनेत्रीने सगळ्यांच्या मनात घर केले आहे. ‘स्काई फायर’ या वेब सीरीजमध्ये सोनल ही मिनाक्षीची भूमिका साकारत आहे. ही भूमिका तिच्यासाठी आव्हानात्मक आहे. या भूमिकेला दोन पैलू आहे. अत्यंत भावनिक आणि तितकीच कठोर वेब सीरीज आहे. यामध्ये मिनाक्षी दिल्लीची असते. सोनल मुळची दिल्लीची असल्याने मिनाक्षी भूमिका साकारताना तिला आणखी सोपे झाले आहे. या सीरीजमध्ये सोनलसोबत प्रतीक बब्बरचीही महत्वपुर्ण भूमिका

काही दिवसांपूर्वीच या वेब सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता सीरीजला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहू ?