Coronavirus : जपानहून अमेरिकन नागरिकांनी स्वदेशी परतावं, US दूतावासाचा ‘सल्ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जपानमधील कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या घटना लक्षात घेता अमेरिकेने शुक्रवारी तेथे राहणाऱ्या आपल्या नागरिकांना आग्रह केला कि, त्यांनी आपल्या देशात परत यावे किंवा अनिश्चित काळासाठी तेथे रहाण्याची तयारी करावी. टोकियो येथील अमेरिकन दूतावासाने आपल्या संकेतस्थळावर म्हटले की, “जर अमेरिकन नागरिकांना त्यांच्या अमेरिकेत परत जायचे असेल तर त्यांनी त्यासाठी आत्ताच तयारी करायला हवी.”

गुरुवारी, जपानमध्ये कोरोना विषाणू-संक्रमित रूग्णांची संख्या 1,314 होती. त्याच वेळी, टोकियोच्या योकोहामा किनाऱ्यावर पार्क केलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रूझवरही 712 लोकांना संसर्ग झाला असल्याचे समजते. देशाचे पंतप्रधान शिंज अबे यांनी कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केला आहे. पंतप्रधान अबेच्या या निर्णयाला आपत्कालीन स्थिती घोषित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

दरम्यान, कोरोनामुळे जपानची राजधानी टोकियोला सर्वाधिक फटका बसला आहे. टोकियोमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर पंतप्रधान शिंजो अबे यांनी राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली. त्याचबरोबर त्यांनी देशात या प्रकरणात आपत्कालीन परिस्थितीची गरज नाकारली. जपानचे प्रवक्ते योशीहिदे सुगा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जपान सध्या आपत्कालीन परिस्थिती लागू करण्याची आवश्यकता असलेल्या स्थितीत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जपानमध्ये आतापर्यंत संक्रमणाची एकूण संख्या 2,617 आहे. या प्रकरणात मृतांची संख्या 65 आहे.