Japanese Towel Exercise | 5 मिनिटांची ‘जपानी टॉवेल एक्सरसाईज’ केल्याने होतील फ्लॅट अ‍ॅब्ज, 10 दिवसात चमत्कार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Japanese Towel Exercise | सुंदर आणि आकर्षक अ‍ॅब्जची इच्छा सर्वांनाच असते. अ‍ॅब्ज बनवण्यासाठी लोक जिम किंवा फिटनेस सेंटरमध्ये तासनतास घाम गाळतात. अब्डोमेन एरिया फ्लॅट करण्यासाठी लोक क्रंचेस, सिट-अप्स आणि प्लॅक्ससारखे अवघड व्यायाम करतात. परंतु आपल्या सर्वांना माहित आहे की, पोटाची चरबी कमी करणे सोपे नाही. (Japanese Towel Exercise)

सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, 5 मिनिटांच्या जपानी टॉवेल एक्सरसाइज (5 minutes Japanese towel exercises) द्वारे अवघ्या 10 दिवसांच्या आत आकर्षक अ‍ॅब्ज बनवता येऊ शकतात (5 minutes Japanese towel exercise will give flat abs). हा व्हिडिओ @tiabagha नावाच्या अकाऊंटवरून शेयर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत सुमारे 28 लाख लोकांनी लाईक आणि कमेंट केले आहे.

हे जपानी टॉवेल टेक्निक जापनीज रिफ्लेक्सोलॉजी अँड मसाज स्पेशालिस्ट डॉक्टर तोशिकी फुकुत्सुजी (Dr. Toshiki Fukutsuji) यांनी शरीर सुडौल करण्यासाठी सुमारे दहा वर्षांपूर्वी विकसित केले होते. त्यांचा दावा होता की, हे टेक्निक पोटाची चरबी कमी करण्यापासून शरीराचे योग्य पोश्चर आणि कंबरदुखीमध्ये दिलासा देण्यात उपयोगी आहे.

स्पेशालिस्टनुसार, या एक्सरसाइजद्वारे पोटाच्या जवळच्या चरबीचा जादा थर हटवता येतो, जो पेल्विक मसलच्या मिसप्लेसमेंटमुळे तयार होतो. ही एक्सरसाईज सतत केल्याने पेल्विक प्लेसमेंट फिक्स होते आणि पोटावर जमलेल्या चरबीचा जादा थर वेगाने कमी होऊ लागतो.

 

काय आहे जपानी टॉवेल टेक्निक?

ही एक्सरसाइज करण्यासाठी एक टॉवेल आणि मॅटची आवश्यकता असते. सर्वप्रथम मॅटवर कमरेच्या बळावर झोपा आणि आपले दोन्ही हात आणि पाय पसरवत शरीरापासून दूर करा. यानंतर एक मीडियम साइजचा टॉवेल आपल्या कमरेच्या खाली ठेवा जो बेंबीच्या अगदी बरोबर खाली असावा. (Japanese Towel Exercise)

आपले पाय खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा आणि पायाच्या दोन्ही अंगठे एकमेकांना सतत स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
हात डोक्याच्या वर एकदम सरळ ठेवा आणि हाताच्या सर्वात छोट्या बोटांचा आपसात स्पर्श करा.
ही एक्सरसाइज सतत 5 मिनिटांपर्यंत करा आणि नंतर आपले शरीर रिलॅक्स होण्यासाठी सोडून द्या.

तज्ज्ञ सांगतात की, या मॅजिकल एक्सरसाईजबाबत ऐकायला चांगले वाटते,
परंतु ती 10 दिवसांच्या आत तुम्हाला परफेक्ट अ‍ॅब्ज देणार नाही हे निश्चित.
प्रत्यक्षात जगातील कोणतीही एक्सरसाइज इतक्या लवकर फ्लॅट अ‍ॅब्ज देऊ शकत नाही.
मात्र, ही बॉडीचे योग्य पोश्चर, बॅकपेन आणि पोटाची चरबी काही प्रमाणात कमी करण्यात उपयोगी आहे.
ती मोठ्या कालावधीपर्यंत केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.

Web Title :- Japanese Towel Exercise | 5 minute japanese towel exercise give you flat abs in just 10 days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Power Crisis In India | देशात वीजेच्या संकटाचा धोका ! 72 थर्मल पावर प्लांटमधील कोळसा संपला, जाणून घ्या कारण

Multibagger Stocks | आश्चर्यकारक शेयर ! 1 लाख रुपयांचे केले 40 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

Pune News | ‘अर्थचक्रा’साठी बँक कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे : केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड (व्हिडीओ)