Multibagger Stocks | आश्चर्यकारक शेयर ! 1 लाख रुपयांचे केले 40 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stocks | आज आम्ही अशा एका मल्टीबॅगर शेयर (Multibagger Stocks) बाबत सांगणार आहोत ज्याने गुंतवणुकदारांचे पैसे काही वर्षातच 40 पट वाढवले आहेत. म्हणजे या शेयरमध्ये लावलेले 1 लाख रुपये 40 लाख रुपये झाले आहेत. तसचे जर कुणी या शेयरमध्ये आजपासून काही वर्ष अगोदर केवळ 2, 5 लाख रुपये लावले असते तर त्याचे मूल्य आता 1 कोई रुपये झाले असते (earning money from stock market). या चांगल्या शेयरबाबत तसेच त्योन किती वेळात गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले ते जाणून घेवूयात…

हा आहे तो मल्टीबॅगर शेयर
या मल्टीबॅगर शेयरचे नाव क्वालिटी फार्मास्यूटिकल्स लिमिटेड (Kwality Pharma) आहे. या शेयरने गुंतवणुकदारांना खुप चांगला रिटर्न दिला आहे. जर कुणी या शेयरमध्ये आजपासून 5 वर्ष अगोदर गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य सुमारे 40 पट वाढले असते.

कुठून कुठे पोहला क्वालिटीचा शेयर रेट
5 वर्षापूर्वी 28 सप्टेंबर 2016 ला BSE वर Kwality Pharma च्या शेयरची किंमत 21.75 रुपये होती जी 1 ऑक्टोबर 2021 ला 878.90 रुपयांवर पोहचली. म्हणजे या 5 वर्षात क्वालिटी फार्माच्या शेयरमध्ये 40 पट वाढ झाली.

मागील 6 महिन्यात सुद्धा मिळाला चांगला रिटर्न
जर एखाद्या गुंतवणुकदाराने 6 महिन्यापूर्वी या फार्मा स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख रुपये 16.30 लाख झाले असते.

शॉर्ट टर्ममध्ये दिला चांगला रिटर्न
या मल्टीबॅगर स्टॉकची प्राईस मागील एका महिन्यात 419.90 रुपयांनी वाढून 878.90 रुपये झाली. या कालावधीत 110 टक्के वाढ झाली. Kwality Pharma च्या शेयरची किंमत 21.75 रुपये होती जी 1 ऑक्टोबर 2021 ला 878.90 रुपयांवर पोहचली. म्हणजे या 5 वर्षात क्वालिटी फार्माच्या शेयरमध्ये 40 पट वाढ झाली. या मल्टीबॅगर स्टॉकची प्राईस मागील एका महिन्यात 419.90 रुपयांनी वाढून 878.90 रुपये झाली. या कालावधीत 110 टक्के वाढ झाली. मागील एक वर्षात Kwality Pharma चा स्टॉक 61 रुपयांवरून वाढून 878.90 रुपये प्रति स्टॉक झाला. या कालावधीत जवळपास 1340 टक्केची वाढ झाली. (Multibagger Stocks)

 

कमी काळात किती वाढले पैसे

क्वालिटी फार्मास्यूटिकल्स लिमिटेडच्या शेयरमध्ये जर एखाद्या गुंतवणुकदाराने 1 वर्षापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती
तर त्याचे मूल्य आता सुमारे 14.40 लाख रुपये झाले असते.
तसचे 5 वर्षापूर्वी या शेयरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य 40.40 लाख रुपये झाले असते.
म्हणजे जर गुंतवणूक 2.5 लाख रुपयांची असती तर ती वाढून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stocks | kwality pharmaceuticals shares made investors money 40 times in 5 years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | ‘अर्थचक्रा’साठी बँक कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे : केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड

Aadhaar Card | ग्राहकांना UIDAI चं ‘गिफ्ट’ ! आता ‘तात्काळ’ होतील ‘आधार’संबंधी ‘ही’ सर्व कामे, जाणून घ्या मोदी सरकारचा प्लान

NCB Raid | जहाजावर ‘रेव्ह पार्टी’ ! शाहरुख खानच्या मुलाची एनसीबीकडून चौकशी; जाणून घ्या नेमकं काय झालंय