Javed Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा आरोप; म्हणाली – ‘कोर्टावरील विश्वास उडाला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Javed Akhtar | गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्यावरुद्ध मानहाणीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या सुनावणीस विविध कारणे देत सुनावणीस गैरहजर राहत होती. अखेर अंधेरी न्यायालयाने गत आठवड्यात अटक वॉरंट जारी करण्याची तंबी दिल्यानंतर सोमवारच्या सुनावणीस कंगनाने हजेरी लावली.

अख्तर (Javed Akhtar) यांचे वकील जय भानुशाली यांनी दाव्यावरील सुनावणीस विलंब करण्यासाठी कंगना दरवेळी नवी कारणे घेऊन येते. न्यायालयाने तिला समन्स बजावताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे, असे म्हटले. न्यायालयाने दाव्यावरील पुढील सुनावणी 15 नोव्हेंबर रोजी ठेवली असून कंगनाच्या अर्जावरील सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी 1 ऑक्टोबर रोजी घेणार आहेत.

खटला अन्य कोर्टात मानहानी दाव्यावरील सुनावणी अन्य काेर्टात वर्ग करण्यासंदर्भात
मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केल्याची माहिती कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी अंधेरी न्यायदंडाधिकाऱ्यांना सोमवारी दिली.

कंगना रनौतचा न्यायालयावरचा विश्वास उडाला आहे.
त्यामुळे या दाव्यावरील सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्यासाठी तिने अर्ज केला आहे.
त्याचबरोबर अख्तर यांच्याविरोधात खंडणी आणि गुन्हेगारी धमकीचा आरोप करत कंगना हिने तक्रार दाखल केली आहे, अशीही माहिती सिद्दिकी यांनी न्यायालयाला दिली.

Web Titel :- Javed Akhtar | kangana says lost faith carta javed akhtar claims have demanded ransom

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PMC GB Meeting | पुणे मनपात निधीसाठी विरोधकांकडून गाणी गाऊन ‘आयुक्तांकडे’ विनवणी; तर सत्ताधाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Actress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न करत हल्लेखोर पसार

Pune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत कर’ विभाग उपेक्षित; जाणून घ्या नेमकं काय झालं