अभिनेत्री जया प्रदा भाजपमध्ये, आजम खान यांना देणार टक्कर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची अभिनेत्री जया प्रदा आज भाजपमध्ये प्रवेश करणार आसलयाची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर जया प्रदा यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केल्‍यास त्‍या रामपूरचे सपा उमेदवार आजम खान यांच्‍याविरोधात निवडणुकीच्‍या रिंगणात उतरतील. याआधी जया प्रदा रामपूरच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी रामपूर मतदार संघातून सपाकडून २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकांमध्ये त्यांना यश देखील मिळाले होते.

आझम खान यांच्यावर ॲसिड हल्ल्याचा आरोप
जया यांनी समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आजम खान यांच्‍यावर गंभीर आरोप केले होते. खान यांनी आपल्‍यावर ॲसिड हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न केला होता, असा गंभीर आरोप जयाप्रदा यांनी आजम खान यांच्‍यावर केला होता. याबाबत बोलताना जया म्हणाल्या होत्या, ”ज्‍यावेळी मी एक महिला म्‍हणून आजम खान यांच्‍यासोबत निवडणूक लढवत होते, त्‍यावेळी माझ्‍यावर ॲसिड हल्‍ला झाला. माझ्‍या जीवाला धोका होता. त्‍यावेळी माझे समर्थन करण्‍यासाठी कुठलाही नेता समोर आला नाही. मुलायम सिंह यांनी एकदाही मला फोन केला नाही.” आता जया प्रदा भाजप पक्षातून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आल्याचे सांगण्यात येत आहे अशातच त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्याचा आझम खान यांच्‍याविरोधात निवडणुकीच्‍या रिंगणात उतरतील असे देखील सांगण्यात येत आहे.

जया प्रदा यांनी १९९४ मध्‍ये तेलगू देशम पार्टीतून आपल्‍या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. तेलुगू देशम पार्टीचे संस्थापक एन टी रामाराव यांनी त्‍यांना पक्षात प्रवेश करण्‍याचे निमंत्रण दिले होते. परंतु, जया प्रदा यांचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्‍याशी मतभेद झाल्‍यामुळे त्‍या तेलगू देशम पार्टीतून बाहेर पडल्‍या होत्‍या.

You might also like