Jayant Patil ED Inquiry | अखेर 9 तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर, कार्यकर्त्यांचा जल्लोष; म्हणाले-‘आता त्यांच्याकडे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडी कार्यालयात (Jayant Patil ED Inquiry) तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली. आयएल आणि एफएस (IL and FS) कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी (Jayant Patil ED Inquiry) बोलावले होते. नऊ तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर जयंत पाटील (Jayant Patil ED Inquiry) म्हणाले, तुम्ही सर्व कार्यकर्ते सकाळपासून ईडी कार्यालयाबाहेर होता. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहे. त्यांचं पूर्ण मी केलं असून, त्यांच्याकडे काहीही प्रश्न असतील असं मला वाटत नाही. तुम्ही थांबलात तुमचे आभार. मी माझे कर्तव्य पूर्ण केलं आहे. आता त्यांच्याकडे काहीही प्रश्न शिल्लक असतील असे मला वाटत नाही.

काय आहे प्रकरण?

आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरु होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती.
या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता.
यापूर्वीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरेंना (Raj Thackeray) नोटीस पाठवण्यात आली होती.
आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग (Money Laundering) झालं आणि पोलिसांनी यात
गुन्हा (FIR) दाखल केला होता. या प्रकरणी अरुणकुमार साहा (Arun Kumar Saha) यांना ताब्यात घेऊन
चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.

Web Title :  Jayant Patil ED Inquiry | after nine hours of interrogation in il fs case ncp jayant patil left the ed office

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा
Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवड : चिखली चौकात भरदिवसा सोन्या तापकीरवर गोळीबार
Pune News | मेट्रो व ठेकेदाराच्या वादात पुणेकर त्रस्त, कर्वेनगर भागातील अर्धवट कामे पूर्ण करण्याची मागणी
NCP Chief Sharad Pawar | मविआमध्ये जागा वाटपाबाबत कोण निर्णय घेणार?, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं