Jayant Patil | ‘नंबर आल्यावर एकमताने…’, अमोल कोल्हेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानावर जयंत पाटलांनी सांगितली ‘मन की बात’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून गरज आहे, ते आदर्श मुख्यमंत्री ठरतली असे विधान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी केलं. कोल्हे यांच्या विधानावर बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर एकमताने चर्चा होईल. माझ्या सत्काराच्या कार्यक्रमात कौतुक करताना अमोल कोल्हे यांनी हे विधान केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

 

जयंत पाटील (Jayant Patil) पुढे म्हणाले, अजितदादा आणि माझ्या किंवा पक्षात कोणतीही स्पर्धा नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे बहुमत आहे. अजितदादा आणि आम्हाला माहिती आहे. पोस्टरबाजी आणि मागणी या कर्यकर्त्यांच्या भावना आणि अमोल कोल्हे यांचे ते मत आहे. इथपर्य़ंतच या गोष्टी मर्यादित असल्याचे पाटील यांनी सांगितले.

अजित पवार (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते पद योग्य पद्धतीने सांभाळत आहेत.
माझ्याकडे पक्षाची जबाबादारी देण्यात आली आहे, ती मी सांभाळत आहे.
पक्षाची ताकद वाढल्याशिवाय पक्ष मोठा झाल्याशिवाय पुढची स्वप्न कोणी बघू नयेत.
आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 54-55 आमदार आहेत. पुढील काळात आमचा पक्ष कशा प्रकारे वाढेल याकडे
आम्ही सर्वांनी लक्ष केंद्रित केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

 

शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असे विधान केले आहे.
यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, आमच्या पक्षात शरद पवार साहेब जे ठरवतात तेच धोरण असतं.
त्यामुळे पवार साहेबांना जे योग्य वाटतं ते पवार साहेबांच्या निर्णयाने होत असते.
आमच्या पक्षात साहेब सर्व स्तरावरचे निर्णय घेऊ शकतात.
यामुळे ते म्हणतील त्याप्रमाणे होईल, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

 

Web Title :- Jayant Patil | NCP leader jayant patil reacts on probables for cm candidates in ncp NCP MP Amol Kolhe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | उद्धवजी… संजय राऊतांच्या मेंदूची तपासणी करुन घ्या, अब्दुल सत्तारांचा सल्ला

Pune Pimpri Chinchwad Crime News | दत्तवाडी पोलिसांकडून गावठी पिस्तुल बाळगणार्‍याला अटक

Karnataka Elections 2023 | कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी 2500 कोटींचा लिलाव, नाना पटोलेंचा गंभीर आरोप