Jayant Patil | ‘मी पुन्हा येईन’.. या वाक्यावरून जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Janyat Patil | राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जंयत पाटील (Jayant Patil) हे आज शिर्डी (Shirdi) दौ-यावर आहेत. दरम्यान, पाटील हे पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर बोलत होते. बोलताना जंयत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य गेल्या अडीच वर्षांपासून ऐकतो आहोत ते सत्यात कधी येईल हे माध्यमांनीच सांगावं”, अशा शब्दात एक खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेमध्ये जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज शिर्डीमध्ये पक्षाच्या लोकांसोबत संवाद साधला.
त्यानंतर पाटील यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे. दरम्यान, राज्यात तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.
तेव्हापासून महाविकास आघाडी आणि भाजप (Mahavikas Aghadi and BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे.
अनेक काही कारणावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येताना दिसत आहे.

दरम्यान, निवडणुकांच्या कालावधीत देवेंद्र फडणवीस यांचे “मी पुन्हा येईन” हे वाक्य प्रसिद्धीस आले आहे.
यावरुन अनेकजण लक्ष्य करताना दिसतात. त्यातच आज जंयत पाटील यांनी फडणवीस यांच्या या वाक्यावरुन टोला लगावला आहे.

 

Web Title : Jayant Patil | ncp maharashtra president jayant patil mocks devendra fadnavis kirit somaiya

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Brain-Eating Amoeba | मुलाच्या शरीरात शिरला असा ’किडा’, खाऊन टाकले मेंदूच्या आतील सर्वकाही! डॉक्टरसुद्धा वाचवू शकले नाही जीव

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 138 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत ब्लेडने केले वार, 7 जणांवर FIR