Jayant Patil | सांगली जिल्हा बँक गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी, जयंत पाटील यांना पुन्हा दणका?

सांगली : पोलिसनामा ऑनलाइन – Jayant Patil | सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणाला मविआ सरकारने स्थगिती दिली होती. मात्र, ही स्थगिती एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारने नुकतीच हटविली आहे. याविषयीचा लेखी आदेश सहकार विभागातील अधिकारी श्रीकृष्ण वाडेकर यांनी सहकार आयुक्तांना दिले. या गैरव्यवहारात कर्जवाटप, इमारतींचे बांधकाम, नोकर भरती, कर्ज प्रकरणातील निर्लेखनासहित अनेक आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यात येणार आहे. यामुळे माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना पुन्हा धक्का तंत्र वापरले आहे.

 

या बँकेतील गैरव्यवहाराबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्याप्रमाणे आयुक्तांनी कलम ८१ नुसार चाचणी लेखापरीक्षण किंवा कलम ८३ नुसार चौकशीचे पुढील आदेश देण्यात आले आहेत. याच चौकशीला गत मविआ सरकारने सप्टेंबर २०२१ मध्ये स्थगिती दिली होती. पुन्हा दोन महिन्यांपूर्वी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकरांनी सहाकार मंत्री सावे यांना भेटून ही स्थगिती उठविण्याची मागणी केली.

 

शिंदे-फडणवीस सरकारातील अधिकारी वाडेकर यांनी पुन्हा चौकशी करण्याचे आदेश काढले. ही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक जयंत पाटलांकडे (Jayant Patil) असल्याने तिच्या चौकशीला एवढे महत्त्व देण्यात आले आहे.

कारभार स्वच्छ असताना, राजकीय आकसापोटी कारवाई
बँकेतील सर्व व्यवहार सुरळीत असतानाही ईडी, आयकर विभाग तसेच नाबार्ड यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली होती.
त्यामध्ये काही हाताशी लागले नाही किंवा सापडले नाही.
बँकेतील नोकर भरतीलाही जिल्हा उपनिबंधकांनी क्लीन चिट दिली.
तसेच नोकर भरतीची याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

 

शासन तसेच सहकार विभागाच्या मान्यतेनुसारच शाखेचे नूतनीकरण, बांधकाम, नोटमोजणी मशिन खरेदी करण्यात आले आहे.
यातील सर्व प्रकाराची चौकशी झाली. मात्र, गैर असे काही आढळले नाही.
तरीही राजकीय आकसापोटी पुन्हा चौकशीचे आदेश दिले आहेत.
या चौकशीला बँक कायदेशीरपणे योग्य उत्तर देईल, असे बँकेचे संचालक दिलीप पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title :- Jayant Patil | reinvestigation into sangli district bank embezzlement jayant patil shocked

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ट्रेडिशनल ड्रेस मधील हॉट फोटोजने चाहत्यांचे वेधले लक्ष

Chief Ministers Gun Collection | भारतातील 8 मुख्यमंत्र्यांपैकी सगळ्यात महाग बंदुका CM एकनाथ शिंदे यांच्याकडे

Prarthana Behere | ‘बेशरम रंग’ या गाण्यावर ‘या’ मराठी अभिनेत्रीचा हॉट अंदाज; चाहते घायाळ