Jayant Patil | सत्तेपेक्षाही लोकशाही टिकवणे सध्या महत्वाचे, जयंत पाटील यांनी मांडली पक्षाची भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्तेपेक्षाही लोकशाही (Democracy) टिकवणे जास्त महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. ते आज राष्ट्रवादी (NCP) भवन मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते. याबैठकीत डॉ. सुनील जगताप (Dr. Sunil Jagtap) यांची राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. (Jayant Patil)

 

यावेळी जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नसून फुले- शाहू-आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी आहे. डॉक्टर, वकील हे शिक्षित वर्ग लोकांचे मत परिवर्तन करू शकतात.

 

ते पुढे म्हणाले, मधल्या काळात आपल्या डॉक्टर सेलने अतिशय चांगली कामगिरी केली, महापूर असो की कोविड, डॉक्टर सेल सेवा करण्यात सर्वात पुढे होता. डॉक्टर सेलने मोफत शिबिरे घेऊन सामान्य लोकांना मदत केली. त्यामुळे सत्तास्थापना हाच पक्षाचा उद्देश नसून लोकशाही मूल्ये टिकवणे हा मूळ हेतु आहे.

 

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedka), महात्मा फुले (Mahatma Phule),
शाहू महाराज (Shahu Maharaj) या महापुरुषांनी महाराष्ट्राला जो पुरोगामी विचारांचा वारसा दिला आहे. लोकशाही मुल्यांचा विचार दिला आहे,
त्याची जपणूक आपल्याला करायची आहे. हे करण्यासाठी आपल्याला उत्स्फूर्तपणे काम करणार्‍या कार्यकर्त्यांचा संच तयार करायला हवा.

उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले,
डॉक्टर सेलच्या प्रत्येक पदाधिकार्‍यांनी लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका लोकांना पटवून द्यावी.
जास्तीत जास्त डॉक्टर आपल्या संघटनेशी कसा जोडता येईल याची काळजी घ्यावी.

 

पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डॉक्टर सेल गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.
अनेक नवनवीन उपक्रम राबवून मावळते प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी ही संघटना वाढवली.
आता डॉ. सुनील जगतापही त्याच जोमाने काम करतील.

 

Web Title :- Jayant Patil | sharad pawar led ncp maharashtra chief jayant patil says fight is not to form a government but to preserve democracy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MS Dhoni | “तुझ्या आयुष्यातील सर्वात अमूल्य गिफ्ट कोणतं?”, धोनीच्या उत्तराने ॲंकरची झाली बोलती बंद

National Games 2022 | महाराष्ट्राच्या राधिका आवटीला तलवारबाजीत मिळाले सुवर्णपदक

T20 World Cup 2022 | जसप्रीत बुमराहची जागा घेणार मोहम्मद शमी, 2-3 दिवसांत ऑस्ट्रेलियाला होणार रवाना