MP : हनी ट्रॅपच्या केसमध्ये जितू सोनीला गुजरातमधून अटक, 56 प्रकरणांमध्ये आहे तो आरोपी

इंदूर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील बहुचर्चीत हनी ट्रॅप प्रकरणात इंदूर पोलिसांनी जीतू सोनी याला गुजरातमध्ये जाऊन अटक केली. जीतू सोनी हा इंदूरमधून प्रकाशित होणाऱ्या एका वृत्तपत्राचा मालक असून गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातमधून त्याला अटक केली. जीतू सोनी याच्यावर बलात्कार, सामूहिक बलात्कार, मानवी तस्करी, खंडणी यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एकूण 56 गुन्हे दाखल आहेत.

मध्य प्रदेशातील मागील कमलनाथ सरकारने सोनीविरोधात बलात्कार, सामूहिक बलात्कार, मानवी तस्करी आणि खंडणीसह 56 गुन्हे दाखल केले होते. यापूर्वी संझा लोकस्वामी वृत्तपत्राचा मालक असलेल्या सोनीचा भाऊ महेंद्र सोनीला पोलिसांनी गुजरातमधील अमरेली येथून अटक केली. महेंद्र सोनी याच्यावर मध्य प्रदेश सरकारने दहा हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. तसेच महेंद्र सोनी याला जीतू सोनीसोबत अनेक गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात आले होते. जीतू सोनी याच्यावर तत्कालीन कमलनाथ सरकारने कारवाई केली होती.

मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान आणि त्यांचे वरिष्ठ सल्लागार आणि भाजप नेत्यांनी मुलींशीसोबत केलेले कथित संभाषण पेपरमध्ये छापल्यानंतर जीतू सोनी याच्याविरोधात कारवाई करण्यात आली. तसेच जीतू सोनीने या संभाषणाची ऑडिओ क्लिप आपल्या यू ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केली होती. मध्य प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर एक लाख साठ हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

राज्यातील मागील काँग्रेस सरकारच्या काळात म्हणजेच 30 नोव्हेंबर 2019 रोजी पोलिसांनी त्याच्या हॉटेल माया आणि इतर ठिकाणी पहिल्यांदा छापे टाकले होते. तेव्हापासून जीतू सोनी हा फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होती. पोलीस त्याचा इतर राज्यात देखील शोध घेत होती. अखेर त्याला गुजरातमधून अटक करण्यात आली.

कठोर कारवाईचे आदेश
वास्तवीक हनी ट्रॅप उघडकीस करून चर्चेत आलेला वृत्तपत्राचा मालक जीतू सोनीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. इंदूर महानगर पालिकेनेही प्रेस कॉम्प्लेक्स परिसरातील सोनी याच्या सांझा लोकस्वामी या पेपरचे कार्यालय पाडण्याचे आदेश दिले होते. जीतू सोनी हा सांझा लोकस्वामी वृत्तपत्राचा मालक असून वृत्तपत्रासाठी त्याने इंदूर विकास प्राधिकरणाकडून जमीन भाड्याने घेतली होती, त्याची भडेपट्टी रद्द करण्यात आली आहे. जीतू नसोनी याचे अनेक बंगले आणि हॉटेल्स आहे. हे सर्व बंगले आणि हॉटेल्स पाडण्यात आले आहेत.