मार्तंड देवसंस्थान जेजुरीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पुरंदर – हवेलीचे आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जेजुरी ( ता . पुरंदर ) येथे मार्तंड देव संस्थान जेजुरी तसेच जिजामाता हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष व विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर, मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे, संदिपआप्पा जगताप, डॉ. संजय खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यालयातील १ हजार १६५ विद्यार्थांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. तसेच त्यांच्या पालकांची तपासणी दोन दिवसात करणार असल्याची माहिती डॉ. संजय खेडेकर यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नंदकमार सागर यांनी केले. विद्यार्थाची हिमोक्लोबिन तपासणी करण्यासाठी मार्तंड देवसंस्थांच्या डायलेसिस विभागाचे व्यवस्थापक शैलेस भन्साळी, लॅब असिस्टंट मंगेश नाझीरकर, सोनाली चौंडकर यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता जगताप यांनी केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी माध्यमिक विभाग प्रमुख कैलास शिर्के, शाळा समन्वयक प्रल्हाट गिरमे, विद्यालयाच्या आरोग्य विभाग प्रमुख छाया पोटे, बाळासाहेब जगताप, सोमनाथ उबाळे, मीना भैरवकर, शोभा पठारे, पांडुरंग आटोळे, महेश खाडे,  कुलदीप साळवे, सागर चव्हाण, मधुसूदन जगताप, अमित सागर सारिका थोपटे, राजेश्री भंडारी, स्नेहा सातभाई यांनी सहकार्य केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/