Coronavirus Impact : जेजुरीच्या खंडेरायाचं मंदिर दर्शनासाठी बंद !

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रचे कुलदैवत असलेले जेजुरीच्या खंडोबा मंदिर देवदर्शन आज मध्यरात्री पासून बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप आप्पा जगताप यांनी दिली.

समस्त ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिक व सर्व भाविकांना कळविण्यात येते की, आज रोजी विश्वस्त मंडळ, गावकरी, खांदेकरी, मानकरी, पुजारी वर्गाची चर्चा झालेेली असून त्यामध्ये सध्या ‘कोरोना व्हायरस’ ची व्याप्ती पाहता खंडोबा मंदिर व कडेपठार (जुना-गड) मंदिर आज मध्यरात्री पासून ३१ मार्च २०२० पर्यंत देवदर्शन बंद ठेवण्यात येणार आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी.

तरी सर्व भाविक भक्तांनी या बाबत सहकार्य करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सहकार्य करावे .