बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी ‘मासूम’कडून पोलीस पाटलांना, पोलीस कर्मचाऱ्यांना ‘मार्गदर्शन’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार ही समस्या आता गंभीर स्वरूप धारण करते आहे.बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनां मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि म्हणूनच बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार कमी करण्यासाठी पुरंदर मधील जेजुरी पोलीस स्टेशन मार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या संदर्भात जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस पाटील,पोलीस कर्मचारी व माहिला दक्षता समितीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

जेजुरी पोलीस स्टेशन, मासूम संस्था,नारी समता मंच व फाऊंडेशन ऑफ चाईल्ड प्रोटेक्शन याच्या संयुक्त विद्यमाने, ग्रामीण भागात तळागाळापर्यंत काम करणा-या पोलीस पाटील, महिला दक्षता कमिटीचे सदस्य व पोलिस कर्मचारी यांना बाल लैंगिक अत्याचार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने,पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी मोहन इंगळे,राहुल शिंदे, दिपक जाधव, नरेंद्र यादव, दिनेश जाधव,मोनाली काळाणे,रोहिणी कापले,प्रियंका चव्हाण,उज्वला कोलते,नारी समता मंचच्या प्राजक्ता उषा विनायक, मासुमच्या जयश्री नलगे,सुनंदा खेडेकर,मंगल कुंजीर,ज्योती चौंडकर,कविता जगताप, अलका बनकर आदींसह विविध गावातील पोलिस पाटील,पोलिस कर्मचारी महिला दक्षता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी बालक कोणाला म्हणायचे? बालकांचे हक्क कोणते? त्यांच्यावर होणारे अत्याचार कोणते ? त्यासाठी कोणते कायदे आहेत ? अशा प्रकारचे अत्याचार आपल्या गावात होवु नयेत म्हणून कोणते प्रयत्न करता येतील, या बाबतची माहिती देण्यात आली. ही माहिती पोलिस पाटलांनी गावात नागरिकांना देवुन जनजागृती करायची आहे असे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले.

बाल लैंगिक अत्याचार दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे यावर बोलन गरजेचं आहे. बालकांना याबाबत सावध करायला हव. त्यांना अत्याचार विरोधात बोलायला शिकवायला हवं. असे नारी समता मंचच्या प्राजक्ता उषा विनायक यानी यावेळी म्हटलं. कार्यक्रमाचे प्रास्तविक अंकुश माने यांनी केले. तर आभार ज्योती चौंडकर यांनी मानले.