जेजुरी शहर व परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर

जेजुरी : दि 8 जुलै पासू जेजुरी शहरात 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून दि 10 रोजी एका पॉझिटिव्ह रुग्णाचे निधन झाले . कोरोना संसर्गाचा प्रसार त्वरित होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जेजुरी शहर व परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले असल्याचे तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सांगितले .

पुरंदर तालुक्यात 11 जुलै पर्यन्त 195 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 83 जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे .113 पॉझिटिव्ह रुग्णांवर सासवड व जेजुरी कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहेत . जेजुरी मध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने जेजुरी शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी जेजुरी प्रतिबंधक क्षेत्र जाहीर केले आहे .

जेजुरी शहर कन्टेन्टमेन्ट क्षेत्र जाहीर केल्याने शहरात अत्यावश्यक सेवा वगळता जेजुरी बंद राहील .कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर येऊ नये,स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या,असे आवाहन जेजुरी पालिकेच्या मुख्याधिकारी पूनम कदम यांनी सांगितले