जेजुरी : नॅशनल हायवेचे अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा : नागरीकांची मागणी

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – जेजुरी येथील लवथळेश्वर परीसरात माही पेट्रोल पंपा समोर जेजुरी-सासवड रोडवर वारंवार अपघात होत असुन त्याची कल्पना वारंवार संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना देऊन देखील त्याची दखल घेतली न गेल्यामुळे अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे अशा या निष्क्रिय आणि बेजबाबदार नॅशनल हायवे चे अधिकारी यांचेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लवथळेश्वर येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

जेजुरी पोलीस स्टेशन आणि जेजुरी नगरपालिकेच्या वतीने ताबडतोब भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाला पत्र व्यवहार करुन गतिरोधक बसवून घेणे गरजेचे आहे अन्यथा अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागणार आहे गेल्याच आठवड्यात या ठिकाणी झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे आणि आज जेजुरीतील एक होतकुरु तरुण जीवन दास कोळी याचा जागीच मृत्यू झाला आहे, याठिकाणी लाॅकडाऊन काळात जवळपास छोटे मोठे पंधरा ते वीस अपघातात झाले असुन त्यामधील तीघे जन मृत्युमुखी पावले आहेत, गतिरोधक बसविण्यासाठी यापुर्वीही रमेश लेंडे, प्रविण शेरे, दादा मुलाणी, अजीत भोंगळे, शामकांत भोंगळे, साहिर शेख, हनुमंत बयास आदिनी पाठपुरावा केला होता.

परंतु बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत आणि त्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लवथळेश्वर येथील नागरिकांनी केली आहे, जेजुरी पोलीस स्टेशन व नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने लक्ष देऊन येथील अपघाती क्षेत्रावर तातडीने गतिरोधक बसवून घेणे अशीही मागणी परीसरातील महिला भगिनींनी व नागरीकांनी केली आहे.