Banking Jobs 2020 : बँकिंग क्षेत्रात नोकरीची ‘सुवर्ण’संधी ! 1850 पदांची मोठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  Banking Jobs 2020 : जर तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेडने बँकिंग असोसिएट आणि प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदासाठी भरती काढली आहे. या अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) ची एकुण 350 पदे आणि 1500 बँकिग असोसिएटची पदे नियुक्त केली जातील. या पदांसाठी अर्ज करण्याची तारीख 20 जूनपासून सुरू होत आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना बँकेची ऑफिशियल वेबसाइट jkbank.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

या पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराचे वय 20 ते 32 वर्षादरम्यान असावे. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, अर्ज भरण्यापूर्वी तो काळजीपूर्वक वाचावा, कारण अर्जात काही चूक आढळल्यास तो रद्द करण्यात येईल.

येथेही करू शकता अर्ज

याशिवाय अनेक इतर विभागातही भरती सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत राजस्थान लोकसेवा आयोग (आरपीएससी) ने संस्कृत शिक्षण विभागात प्राध्यापक-विद्यालय पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार आरपीएससी स्कूल लेक्चरर भरती 2020 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 8 जूनपासून सुरू होईल आणि 7 जुलै 2020 पर्यंत चालेल. एकुण 22 पदांवर 9 विविध विषयात भरती करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, ज्योतिष, यजुर्वेद, सामान्य दर्शन, जैन दर्शन आणि न्याय दर्शन विषयांसाठी नियुक्त्या करण्यात येतील.