John Abraham | अभिनेता जॉन अब्राहमने खाल्ल्या होत्या तब्बल 64 रोटी; वैतागून वेटर म्हणाला की…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हा त्याच्या फिटनेस साठी नावाजला जातो. अभिनेता जॉन अब्राहमने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असून त्याचे चित्रपट हिट ठरले आहेत. जॉन अब्राहमचा (John Abraham) मोठा चाहता वर्ग असून त्यांच्या फिट व हेल्दी ब़ॉडीने आजही तरुणी घायाळ होतात. मात्र एकदा जॉनने तब्बल 64 रोटी खाल्या होत्या. कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) मध्ये त्याने एक हॉटेलचा मज्जेशीर किस्सा शेअर केला होता.


https://www.instagram.com/p/Crn0xrCInrZ/?igshid=MzRlODBiNWFlZA==


https://www.instagram.com/p/CnLvb3RP-M4/?igshid=MzRlODBiNWFlZA==

बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम हा त्यांच्या फिटनेटसाठी ओळखला जातो. तो त्याच्या बॉडीसाठी (John Abraham Body) योग्य डाएट व तासंतास जीममध्ये घालवताना दिसतो. मात्र एक काळ असा होता की जॉनने एका वेळेस अगदी 64 रोट्या खाल्ल्या होत्या. जॉनने एकदा त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याकरिता लोकप्रिय कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्य़ाच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलघडा केला होता. दरम्यान कपिल शर्माने (Kapil Sharma) त्याला विचारले की, तुमच्या बद्दल अशी अफवा आहे की तुम्ही एका हॉटेलमध्ये 64 रोट्या खाल्या होत्या. यावर जॉनने हसून उत्तर दिले की ही काही अफवा नाही तर खरी गोष्ट आहे. त्य़ाच्या या बोलल्याने एकच हशा पिकला.


https://www.instagram.com/p/CkfFi7qNYZ3/?igshid=MzRlODBiNWFlZA==


https://www.instagram.com/p/CkX1NUMv2G3/?igshid=MzRlODBiNWFlZA==

यावेळी अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) म्हणाला की, आता मी माझ्या फिटनेसची खूप काळजी घेतो, पण एक काळ असा होता जेव्हा मी खूप खाऊन-पिऊन रहायचो. ही गोष्ट त्याच वेळेची आहे जेव्हा मी एका रेस्टॉरंटमध्ये 64 रोट्या खाल्ल्या होत्या. त्यानंतर एक वेटर माझ्याकडे आला आणि म्हणाला की सर अजून भात पण आहे. जॉनचा हा किस्सा ऐकून प्रेक्षक जोरजोरात हसू लागले. अभिनेता जॉन अब्राहम यावर्षी ‘पठान’ चित्रपटामध्ये (Pathan Movie) झळकला होता. यामध्ये त्याने शाहरुख खान (Shah Rukh Khan) व दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सोबत स्क्रीन शेअर केली होती. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. याआधी जॉन अब्राहमने ‘जिस्म’ (Jism), ‘धूम’ (Dhoom), ‘दोस्ताना’ (Dostana), ‘सत्यमेव जयते’ (Satyameva Jayate) व ‘ढिशूम’ (Dishoom) चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | …अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री बनणार नाहीत, शिवसेना आमदाराचा इशारा

Swarad Foundation Pune | स्वारद फाऊंडेशन ट्रस्ट आणि हिंदू जनजागृति समितीच्या वतीने युवती व महिलांना मोफत शौर्य प्रशिक्षण

Pune Crime News | नेमक काय घडलं की ACP भारत गायकवाड यांनी पत्नी अन् पुतण्याला घातल्या गोळया; स्वतः केली आत्महत्या

Maharashtra Monsoon Session | ‘विरोधी पक्षनेत्यांनी आम्हाला जे शहाणपण शिकवले ते…’ निधीवाटपावरुन सभागृहात खडाजंगी, देवेंद्र फडणवीस म्हणाले – ‘मला दुर्दैवाने इतिहासात…’ (व्हिडिओ)

RSS Madandas Devi Passed Away | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मदनदास देवी यांच्यावर पुण्यात अंत्यस्कार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार