‘जॉन्सन’ बेबी पावडरमध्ये ‘कॅन्सर’ चे घटक, कंपनीनं मागवले 33 हजार डब्बे परत

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – बेबी प्रॉडक्ट बनवणारी जॉन्सन अँड जॉन्सन अमेरिकन कंपनी सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. बेबी पावडरच्या नमुन्यांमध्ये एस्बेस्टोसचे घटक आढळले आहेत. कंपनीने सुमारे 33 हजार बेबी पावडरचे डब्बे परत मागवले आहेत. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

एस्बेस्टोस म्हणजे काय ?
एस्बेस्टोस एक प्राणघातक कार्सिनोजन आहे ज्यामुळे ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. अमेरिकेच्या आरोग्य नियामकांना प्रथमच एखाद्या उत्पादनामध्ये एस्बेस्टोस सामग्री आढळली. या बातमीनंतर, जॉन्सन अँड जॉन्सनचे शेअर्स अमेरिकन शेअर बाजारामध्ये 6 टक्क्यांनी घसरले आणि 127.70 डॉलरवर बंद झाले.

अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर, शाम्पू आणि साबण यासाठी भारतासह जगातील इतर देशांमध्ये खास प्रसिद्ध आहे. कंपनीला अनेक उत्पादनांमुळे खटला आणि दंड सहन करावा लागला आहे.

भारतातही घटक आढळले –
भारतात, जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबीशाम्पू मध्ये कार्सिनोजेनिक घटक आढळले. मागील एप्रिलमध्ये राजस्थान ड्रग कंट्रोल अहवालात बेबी शाम्पूमध्ये कॅन्सरयुक्त घटक आढळले होते. यानंतर, बाल अधिकार हक्क संरक्षण आयोगाने राजस्थानच्या ड्रग कंट्रोलरच्या अहवालाच्या आधारे एक आदेश जारी केला आणि पुढील सूचना येईपर्यंत जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी शाम्पूची विक्री थांबविण्याबाबत सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले. यासह, बेबी शाम्पूची सर्व उत्पादने बाजारातून हटवण्याचे आदेश दिले होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी