‘दबंग’ गिरी भोवली ! सलमान खान विरोधात पोलिसात तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाईजान सलमान खान पुन्हा एकदा गोत्यात आला आहे. फोन हिसकावत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली एका पत्रकाराने मुंबईच्या डीएन नगर पोलिस ठाण्यात सलमान खान विरोधात तक्रार दाखल केली आहे. अशोक श्यामलाल पांडे असे तक्रारदार पत्रकाराचे नाव आहे. यानंतर सलमानच्या सुरक्षारक्षकानेही समांतर तक्रार दाखल केली आहे. संबंधित पत्रकाराने सलमानचा पाठलाग केला आणि विना परवानगी व्हिडीओ शुट केल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/iSalmansCombat/status/1121048995021959168

काय आहे प्रकरण

सलमान खान बुधवारी (दि24 एप्रिल रोजी) सायंकाळी जुहू रस्त्यावर सायकलिंग करताना दिसला. यावेळी एका पत्रकाराने सलमानला रस्त्यावर सायकलिंग करताना पाहून सलमानचे व्हिडीओ शुट करण्याचा प्रयत्न केला. परंतु़ हे लक्षात येतान सलमान भलताच चिडला. त्याने त्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावला. परंतु काही वेळाने सलमानच्या बॉडीगार्डने हा मोबाईल परत केला. परंतु हे प्रकरण इथेच मिटले नाही. यानंतर श्यामलाल पांडे यांनी या प्रकरणी पोलिसात धावत घेत तक्रार दाखल केली. सलमान खान हा एक सेलिब्रिटी आहे आणि या नात्याने कुणाच्याही गाडीत असा हात टाकून तो मोबाईल हिसकावू शकत नाही. त्यामुळे सलमान विरोधात कारवाई करण्यात यावी.” असे या तक्रारीत म्हटले आहे.


यानंतर मात्र सलमान बॉडीगार्डनेही या सगळ्या संदर्भात एक समांतर तक्रार दाखल केली. संबंधित पत्रकाराने सलमान पाठलाग केला आणि विना परवानगी व्हिडीओ शुट केल्याचे त्याने म्हटले आहे.