‘सिंगर’ जुबिन नौटियालनं रिलीज केलं रोमँटीक गाणं ‘मेरी आशिकी’ ! काही तासातच मिळाले लाखो Views (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  रोमँटीक गाण्यातून लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या बॉलिवूडमधील फेमस सिंगर जुबिन नौटियाल याचं नवीन रोमँटीक गाणं रिलीज झालं आहे. बॉलिवूडमध्ये अनेक हिट साँग दिल्यानंतर जुबिन यानं नवीन गाणं रिलीज केलं आहे. मेरी आशिकी असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं एवढं व्हायरल झालं आहे की आतपर्यंत या गाण्याला लाखो व्ह्युज आणि हजारो लाईक्स मिळाले आहे. युट्युबच्या ट्रेडिंगच्या या यादीत हे गाणं टॉपला दिसत आहे.

जुबिनच्या मेरी आशिकी या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर रोचक कोहलीनं या गाण्याला संगीत दिलं आहे. या गाण्याला जुबन नौटियालनं आवाज तर दिलाच आहे, सोबतच त्यानं यात परफॉर्मही केलं आहे. या गाण्यात त्याच्यासोबत फेमस पंजाबी सिंगर आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस इहाना ढिल्लन आणि अल्तमश फराज दिसत आहेत. भूषण कुमारच्या टी सीरिज अंतर्गत हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

मेरी आशिकी हे गाणं सध्या खूप व्हायरल होत आहे. या गाण्याला आतापर्यंत 12 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. गाण्याची शुटींग लॉकडाऊनच्या आधीच मेघालयमधील एक लहान शहर दाऊकी येथे करण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like