Jumbo Oxygen Plant in Mumbai | मुंबईत जम्बो ऑक्सिजन प्लांटची उभारणी ! दिवसाला 1500 ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jumbo Oxygen Plant in Mumbai | मुंबई पुण्यासह राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) अधिकाधिक वाढताना दिसत आहे. दैनंदिन बाधितांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईमधील (Mumbai News) माहुल येथे जम्बो ऑक्सिजन प्लांट (Jumbo Oxygen Plant in Mumbai) उभा करण्यात आला आहे. याच प्लांटमधून आता दिवसाला जवळपास 1500 ऑक्सिजन सिलिंडरची (Oxygen Cylinder) निर्मिती केली जाणार आहे. जम्बो ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते झाले. या प्लांटमुळे आता मुंबईसह राज्यात याचा पुरवठा होऊ शकतो.

 

कोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra Government) आणि मुंबई महानगरपालिका (BMC) सज्ज झाली आहे. परंतु, नागरिकांनी नियमांचं पालन करुन कोरोना विरोधातील लढाईत सक्रिय सहभाग घ्यायला हवा, असं आवाहन देखील त्यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं. त्याचबरोबर अशाप्रकारचे भव्य प्रकल्प असणारी देशातील पहिली महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची नोंद झाल्याचं देखील त्यांनी नमुद केलं आहे.

 

दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्यातील महाविकास आघा़डी सरकारने ‘मिशन ऑक्सिजन’ची (Mission Oxygen) घोषणा केली होती.
त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Shiv Sena MP Rahul Shewale)
यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील मोठ्या कंपन्यांना ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचं आवाहन केलं होतं.
याला प्रतिसाद देत भारत पेट्रोलियम कंपनीनं मुंबई महापालिकेच्या सहाय्याने जम्बो ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली आहे,
म्हणजेच शेवाळे यांच्या पाठपुराव्यानंतर या ऑक्सिजन प्लांटचं काम मार्गी लागलं आहे.

 

Web Title :- Jumbo Oxygen Plant in Mumbai | mumbai jumbo oxygen plant 1 5 thousand oxygen cylinders day will now be produced Aditya Thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nawab Malik | ‘शरद पवार आता फडणवीसांना ‘काशीचा घाट’ दाखवतील’ – नवाब मलिक

 

LIC Jeevan Shiromani | केवळ 4 वर्षात तुम्हाला करोडपती बनवू शकते ‘ही’ LIC Policy, जाणून घ्या सविस्तर

 

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये शहरामध्ये ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येचा तीन लाखांचा टप्पा पार, गेल्या 24 तासात 2365 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corporation | मध्यवर्ती शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ‘खाचखळग्यांचा’ त्रासाची डेडलाईन 10 फेब्रुवारीपर्यंत; 20 जानेवारीची डेडलाईन हुकली

 

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांचं आव्हान, म्हणाले – ‘उत्पल पर्रिकरांना उमेदवारी देतो, संजय राऊतांनी ही जबाबदारी घ्यावी’