Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये शहरामध्ये ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येचा तीन लाखांचा टप्पा पार, गेल्या 24 तासात 2365 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या (Pimpri Corona Updates) दैनंदिन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. रविवारी (दि. 17) शहरात 2626 नवीन रुग्ण आढळून आले होते. यामध्ये आज थोडी घट झाली आहे. रुग्ण वाढत असताना ओमायक्रोन व्हेरियंटने (Omycron Covid Variant) चिंता वाढवली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Updates) 2365 नवीन रुग्ण आढळून आले असून रुग्ण संख्येचा तीन लाखांचा टप्पा पार झाला आहे. गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 2365 नवीन रुग्ण (Pimpri Corona Updates) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 2 हजार 359 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1271 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 82 हजार 390 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरामध्ये सध्या 16 हजार 169 ॲक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहेत. यामध्ये होम क्वारंटाईनमध्ये 15 हजार 654 तर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 515 रुग्ण आहेत. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,531 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

ओमायक्रोनचे 3 नवीन रुग्ण
आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये ओमायक्रोनचे 3 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे रुग्ण रॅण्डम तपासणीमध्ये (Random Check) ओमायक्रोन बाधित आढळून आले आहे. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Web Title : Pimpri Corona Updates | In Pimpri Chinchwad the number of corona patients in the city crossed the three lakh mark 2365 new patients in the last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा