#IMP : स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी भन्नाट सुविधा… मोबाईल रिपेअरींग, एक्सचेंज आणि बरंच काही…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपनीने भारतात 23 ते 29 एप्रिल पर्यंत सुपर व्हॅल्यु वीकचे आयोजन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुपर व्हॅल्यु वीकमध्ये वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवर घसघशीत डिस्काऊंट मिळणार आहे.

यात तुम्ही फक्त 99 रुपयांत मोबाईल प्रोटेक्शन खरेदी करू शकणार आहात. फ्लिपकार्ट कम्प्लीट प्रोटेक्शन मध्ये तुमच्या फोनला वॉटर डॅमेज, ब्रांड ऑथोराईज्ड रिपेअर आणि सुविधाजनक पिकअप व ड्रॉपची सुविधाही मिळते.

सुपर व्हॅल्यु वीक सेलमध्ये जुन्या स्मार्टफोनवर अतिरीक्त एक्सचेंज प्राईज मिळणार आहे. याद्वारे तुम्ही नवीन फोनवर डिस्काऊंट मिळवू शकता. फ्लिपकार्टचं म्हणणं आहे की, या सुविधेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांचा स्मार्टफोन 10 दिवसांत रिपेअर केला जाणार आहे.

दरम्यान 99 रुपयांच्या प्लॅनची वैधता किती असेल हे मात्र अद्याप समजलेले नाही. या सुविधेत स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरचाही लाभ मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही ऑफर काही निवडक स्मार्टफोनसाठीच असणार आहे. परंतु ते स्मार्टफोन कोणते असणार आहेत याबाबत अद्याप फ्लिपकार्टने कोणतीही माहिती दिलेली नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like