आता व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंगबरोबरच पैसेही करा ट्रान्सफर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दैनंदिन व्यवहारांमध्ये रोख रकमेपेक्षा नागरिकांचा डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन व्यवहारांवर भर वाढला आहे. मोबाइलच्या साह्याने पेमेंट करण्याला ग्राहकांकडून वाढती पसंती मिळत आहे. त्यामुळे ‘डिजिटल पेमेंट ॲप’ लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे लवकरच व्हॉट्सॲपही डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. गुगल पे, पेएटीएम यांच्यापाठोपाठ आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(NPCI) ने व्हॉट्सअपला छोटे व्यवहार करण्याच्या अटीवर चाचणी करण्याची परवानगी दिली आहे.

भारतात व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. Whatsapp Pay च्या माध्यमातून कंपनी डिजिटल पेमेंटच्या स्पर्धेत उतरणार आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्हाला पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी व्हॉट्सॲपकडून पेमेंट सुविधेची चाचणीही करुन घेण्यात येणार आहे. काही मर्यादीत युजर्सना Whatsapp Pay ची सुविधा देऊन त्याची चाचणी होईल. सहा महिन्यांमध्ये ही चाचणी पूर्ण होईल त्यानंतर युजर्सना या सुविधेचा लाभ घेता येईल. ही चाचणी भारतात लागू करण्यासाठी त्यांना परवानगी मिळाली आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला आता व्हॉट्सॲपवरून पैसेही पाठवता येणार आहेत. अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅपने दिली आहे.

असे करा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पेमेंट-

व्हॉट्स अ‍ॅपमध्ये नवं पेमेंट फीचर ऑप्शन दिलं जाईल. या पेमेंटवर क्लिक करताच तुम्ही यूपीआय पेजशी जोडले जालं. त्यानंतर युपीआय किंवा बॅंक अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करता येईल.