Justice Ramesh Dhanuka | न्यायाधीश रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Justice Ramesh Dhanuka | उच्च न्यायालयातील न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका (Justice Ramesh Dhanuka) यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) मुख्य न्यायमूर्ती (Chief Justice) पदाची शपथ घेतली.

 

आज राजभवन (Raj Bhavan Maharashtra) येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस (Maharashtra Governor Ramesh Bais) यांनी न्या. धानुका यांना पदाची शपथ दिली.

 

शपथविधी सोहळ्याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमल किशोर तातेड ( Kamal kishor Tated) , मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ (Birendra Saraf), माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी (Ashutosh Kumbhakoni), पोलीस महासंचालक रजनीश सेठ (IPS Rajnish Seth) तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

 

सुरुवातीला राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर (Manisha Mhaiskar IAS) यांनी न्या. धानुका (Justice Ramesh Dhanuka) यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखवली. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली.

दिनांक 31 मे, 1961 रोजी न्या. रमेश धानुका यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई (Mumbai) येथे झाले.
त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य आणि कायद्याची पदवी संपादन केली. 1985 मध्ये मुंबई विद्यापीठाने (Mumbai University)
घेतलेल्या तिसऱ्या वर्षाच्या कायद्याच्या परीक्षेत त्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आणि द्वितीय क्रमांक मिळविला.
ते गेल्या अनेक वर्षांपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या Brihanmumbai Municipal Corporation (BMC)
वरिष्ठ वकील पॅनेलवर होते. न्या. धानुका दिनांक 23 जानेवारी 2012 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून रुजू झाले.

 

Web Title :  Justice Ramesh Dhanuka | Justice Ramesh Dhanuka sworn in as Chief Justice of Bombay High Court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा