दागिने, मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्यास पकडले

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

एका पेट्रोल पंपावर थांबलेल्या कारमधून सोन्याचे दागिने, तीन मोबाईल लंपास करणा‍ऱ्या चोराला पोलिसांनी अटक केली आहे. म्हैसाळ (ता. मिरज) येथील पेट्रोल पंपावर हा चोरीचा गुन्हा घडला होता. अटक केलेल्या आरोपीचे नाव रवि मारूती माने-बजंत्री (३०, रा. शेडशाळ, ता. शिरोळ) असे आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B07B6SN496,B01N0WVC16′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3a2a1351-b2b9-11e8-9c85-7149badd2a4b’]

२४ एप्रिल २०१७ रोजी शिवाजी बाबुराव कोळेकर (रा. नाशिक) म्हैसाळमार्गे सौंदत्तीला निघाले होते. म्हैसाळ येथे रात्री त्यांच्या गाडीची लाईट बंद पडल्याने एका पेट्रोल पंपावर गाडी लावून ते थांबले होते. त्यावेळी अज्ञातांनी त्यांच्या गाडीतील सोन्याचे दागिने व तीन मोबाईल लंपास केले होते. यातील मोबाईल रवि माने तसेच त्याचा साथीदार जगन्नाथ सुखदेव पाटील (२८, रा. बेडग) वापरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली होती. त्यानुसार रवि माने याला चौकशीसाठी सांगलीत बोलवण्यात आले होते. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या चोरीतील दुसरा संशयित जगन्नाथ पाटील फरारी आहे.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, अमित परीट, शशिकांत जाधव, संदीप पाटील, सुनील मदने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

जाहिरात