काही तासांपुर्वी भाजपात ‘एन्ट्री’ केलेल्या ज्योतिरादित्य शिंदेंना राज्यसभेचं ‘तिकीट’ ; उदयनराजे भोसले, आठवले यांच्यासह 11 जणांना उमेदवारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेवर रिक्त जागांवर भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा होती. त्यात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार याची देखील चर्चा होती. यात काही दिवसांपुर्वी भाजपात प्रवेश करणारे उदयनराजे भोसले यांचे नाव रेसमध्ये होते. त्यानुसार आज भाजपकडून आपल्या राज्यसभेतील जागांसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे, यात उदयनराजे भोसले यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्यासह भाजप सहयोगी म्हणून रामदास आठवले यांना देखील भाजपकडून संधी देण्यात आली आहे.

यासह काल पासून चर्चेत असलेले मध्य प्रदेशचे काँग्रेसचे बंडखोर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना देखील भाजपात प्रवेश करताच राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र – उदयनराजे भोसले, रामदास आठवले (भाजप सहयोगी)
आसाम – भुवनेश्वर कातीला, बुस्वजीत डायमरी (भाजप सहयोगी)
मध्यप्रदेश – ज्योतिरादित्य शिंदे
बिहार – विवेक ठाकूर
गुजरात – अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा
झारखंड – दिपक प्रकाश
मणिपूर – लिएसेंबा महाराजा
राजस्थान – राजेंद्र गहलोत