‘तो’ फोटो SHARE करत काजल अग्रवालने दिला अनोखा संदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काजल अग्रवाल हे साऊथच्या सिनेमातील एक मोठं नाव आहे. दाक्षिणात्य सिनेजगतातील ही या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. तिचे सौंदर्य तर घायाळ करणारे आहेच परंतु तिचा अभिनयदेखील मोहित करणारा असा आहे. सध्या काजल चर्चेत आली आहे. एका फोटोमुळे काजलची चर्चा होताना दिसत आहे. तिने मेकअपविना तिचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो आणि त्याला दिलेलं कॅप्शन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

मेकअपविना फोटो शेअर करत तिने आहे तसे स्वीकारण्याचा खास संदेश दिला आहे. काजलने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते की, “लोक स्वत:च जास्त शोध घेऊ शकत नाहीत. कारण आपण अशा जगात वावरतो आहोत जे शारीरिक आकर्षणाने वेडं झालं आहे. सोशल मिडियाने तर आपला सन्मानच गिळंकृत केला आहे. सौंदर्यप्रसाधनांवर कोट्यावधी रुपये खर्च होताना दिसतो. अधार्मिकपणाची वृत्ती बाळगणारे अनेकजण अस्तित्त्वात असल्याचे दिसत आहे. त्या ओळींमधून आपण गर्दीत सामील होण्याचा प्रयत्न करतो किंवा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला खरंच आनंदी राहायचे असेल तर त्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे जेव्हा आपण स्वत:ची खोटी प्रतिमा तयार करण्यापेक्षा स्वत:ला आहे तसे स्विकारण्यास सुरुवात करतो. जरी मेकअपने आपले बाह्यसौंदर्य खुलण्यास मदत होते परंतु मेकअप कधीच आपलं चारित्र्य बनवण्यात मदत करू शकत नाही किंवा आपलं चारित्र्य सांगण्यास मदत करत नाही. परंतु जसे आपण आहोत तसे स्वत:ला स्विकारण्यात खरे सौंदर्य आहे.”

दरम्यान आत्मविश्वास हेच खरे सौंदर्य असे म्हणत साऊथ अॅक्ट्रेस साई पल्लवीनेदेखील सौंदर्याची नवी परिभाषा मांडली होती. एका मुलाखतीत ती बोलत होती. ज्यांना दिसण्यावरून न्यूनगंड असतो त्यांच्यासाठी तिने खूप मोठा संदेश दिला होता.