Kajol-Karan Johar | आता काजोल साकारणार ‘या’ स्टारकीडच्या आईची भूमिका; कयोज इराणी करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

पोलीसनामा ऑनलाइन : Kajol-Karan Johar | अभिनेत्री काजोलने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकताच तिचा ‘सलाम वेंकी’ नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शन झाला. या ट्रेलरमुळे चाहते आता चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तर आता काजोलच्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा एक आनंदाची बातमी आहे. काजोल पुन्हा एकदा करण जोहरच्या चित्रपटात दिसणार आहे. (Kajol-Karan Johar)

‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ या करण जोहरच्या चित्रपटांमध्ये काजोलने उत्तम अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले होते. आता पुन्हा एकदा काजोल आणि करण जोहर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटात ती सैफ अली खानच्या मुलाची म्हणजेच इब्राहिम खानच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन बोमन इराणी यांचा मुलगा कयोज इराणी करणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन द्वारे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. (Kajol-Karan Johar)

या चित्रपटातून इब्राहिम खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
तर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढील वर्षी सुरुवात होण्याची शक्यता आहे.
या चित्रपटाची कथा देशाच्या संरक्षण दलाभोवती विणली जाणार असल्याचे दावे करण्यात येत आहेत.
मात्र अद्याप तरी ठोस माहिती समोर आलेली नाही.
तर ‘सलाम वेंकी’ हा चित्रपट येत्या 9 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
या चित्रपटात काजल सोबत राजीव खंडेलवाल,आहाना कुमरा, प्रकाश राज हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत
दिसणार आहेत. पाहुणा कलाकार म्हणून आमिर खान या चित्रपटात दिसणार आहे.

Web Title :- Kajol-Karan Johar | bolllywod actress kajol will be again working with karan johars new film and also playing mother role of ibrahim khan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sunny Waghchoure-Golden Boy | बिग बॉस 16 मध्ये एमसी स्टॅनला टक्कर देण्यासाठी पुण्याचा गोल्डन बॉय घेणार एंट्री

Eknath Khadse | ‘मग एवढे दिवस तुझी जबान चूप का राहिली?’ एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना एकेरी भाषेत सुनावलं

Chhagan Bhujbal | “सध्याच्या स्त्रियांचे, समाजाचे आणि शिक्षण व्यवस्थेचे आदर्श चुकलेत” -छगन भुजबळ