महाराष्ट्र बंद; काकासाहेब शिंदेच्या जलसमाधीवर कोण काय म्हणाले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरू असताना काकासाहेब शिंदे या तरूणाने नदीत उडी मारुन जलसमाधी घेतली. या प्रकारामुळे इतके दिवस शांततेत सुरू असलेल्या मराठी क्रांती मोर्चाने तिव्र स्वरूप धारण केले. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. राज्यभर सुरू असलेल्या मोर्चाला अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मराठी समाजाने पुकारलेल्या लाक्षणिक बंद बाबत राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. पाहूयात कोण काय म्हणले…

विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे

मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने घेतलेली जलसमाधी अतिशय दुर्दैवी आहे. सरकारच्या कुटीलनीतीचा आणि फसवणुकीचा हा बळी असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. तर मराठा आरक्षणासाठी आपण संघर्ष कायम ठेवू. या लढ्यात मी तुमच्यासोबत आहे. मात्र या आंदोलनाने जीवित वा वित्तीय हानी न होऊ देता आपण लढा कायम ठेवला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी मराठा मोर्चाच्या संघटनांना केले.

खासदार : सुप्रिया सुळे

मराठा आरक्षणाची मागणी करीत एका बांधवाने जलसमाधी घेतली.ही बातमी दुःखद आहे. हा बळी सरकारच्या खोटारडेपणाचा व प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा असल्याची खोचक टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने वारंवार वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले आहे. आपण मराठा समाजाची घोर फसवणूक केली आणि अजूनही करत आहात, असल्याचेही त्या म्हणाल्या.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’851fcdb3-8f11-11e8-a37b-8b438968cac9′]

राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष : चित्रा वाघ

आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशीच पांडुरंगाच्या पंढरीत सरकारच्या खोट्या आश्वासनांनी काकासाहेब शिंदे चा बळी घेतला अतिशय दुदैवी घटना असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच, किती जणांच्या सरणावर बसून राज्य करणार आहे हे नराधम सरकार, अशा कडक शब्दात त्यांनी फडणवीस सरकारचा समाचारही घेतला.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलनात जीवाची बाजी लावणाऱ्या काकासाहेबला १० लाखांची शासकीय मदत जाहीर करण्यात आली आहे. पण, अनेक मराठी बांधवांच्या मनात हाच प्रश्न आहे कि, काकासाहेब नक्की कोण होता.

जाणून घेऊयात हा तरूण कोण आहे?

मराठा समाजाच्या आंदोलनात गोदावरी नदीत उडी मारून जलसमाधी घेतलेला काकासाहेब हा तरुण मूळचा गंगापूर तालुक्यातील कायगाव कानट येथील रहिवासी होता. तो युवा सेना जिल्हाध्यक्ष संतोष माने यांच्या खाजगी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करत होता.
काकासाहेबच्या आई-वडील आणि लहान भाऊ आहे कुटुंब आहे. भाऊ अद्याप शिक्षण घेत असून काकासाहेब हाच कुटुंबाचा कमवता मुलगा होता.

[amazon_link asins=’B00ROP1JXQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’90f60c01-8f11-11e8-959d-177b0c930ff4′]