Kalyan Crime | दुर्देवी ! आर्थिक तंगीमुळे प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकाची आत्महत्या, कोरोनामुळे 18 महिने व्यवसाय होता ठप्प

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – Kalyan Crime | अनेक लहान-मोठ्या व्यवसायांवर कोरोनामुळे संकट आले आहे. अनेक व्यवसाय असे आहेत जे मागील दिडवर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ठप्प झाले आहेत. यामुळे आर्थिक तंगीला तोंड देणार्‍या काही व्यवसायिकांचे जगणे अवघड झाले आहे. अशाच आर्थिक तंगीने त्रस्त झालेल्या कल्याण पूर्वेमधील बंडू पांडे (Bandu Pandey) या प्रिंटिंग प्रेस व्यवसायिकाने (Printing Press Business man) मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या (Kalyan Crime) केल्याची घटना घडली आहे.

कल्याण पूर्व भागातील तिसगाव नाका परिसरातील मातोश्री अपार्टमेंटमध्ये बंडू पांडे (Bandu Pandey) राहात होते. उल्हासनगरच्या कॅम्प 3 येथे त्यांचा ओम शांती प्रिन्टर्स (Om Shanti Printers) हा व्यवसाय होता. अचानक आलेल्या कोरोना संकटामुळे मागील दिडवर्षापासून त्यांचा प्रिटिंग प्रेसचा व्यवसाय ठप्प झाला होता.

इतक्या मोठ्या कालावधीपर्यंत व्यवसाय डबघाईला आल्याने पांडे आर्थिक तंगीत होते. मागील 15 पंधरा दिवसांपासून त्यांनी प्रिंटिंग प्रेसचे साहित्य विकण्यास सुरूवात केली होती. यामध्ये त्यांनी प्रिंटिंगची महागडी मशीन सुद्धा विकून टाकली. आर्थिक तंगीने खचलेल्या पांडे यांनी नैराश्यातून रविवारी मध्यरात्री घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पांडे यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांची पत्नी आणि दोन मुली दुसर्‍या खोलीत होत्या.
घटनास्थळी सुसाईड नोट (Suicide Note) मिळाली असून आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असे त्यात म्हटले आहे.
कोळसेवाडी पोलिस ठाण्यात (kolsewadi police station) आत्महत्येची नोंद करण्यात आली असून
पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय गोडे (Sub-Inspector of Police Dattatraya Gode) करत आहेत.

Web Title :- Kalyan Crime | steps taken printing press business stalled suicide strangulation professional, kolsewadi police registered AD

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Assam-Mizoram Border Conflict | आसाम-मिझोराम सीमा संघर्षाला हिंसक वळण; गोळीबारात आसामचे 6 पोलीस मृत्युमुखी तर SP वैभव निंबाळकर जखमी

Pune Crime | एक कोटी 18 लाखाच्या फसवणूक प्रकरणी पुणे पोलिसांकडून बिल्डरला अटक; 33 जणांविरोधात FIR

Supreme Court | महामार्गावरील दारूच्या दुकानाबाबत सुप्रीम कोर्टाने दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश