बाबरी मशीद प्रकरण : कल्याण सिंहांवर कट रचून वैमनस्य परसवण्याचा आरोप निश्‍चित, 2 लाखांच्या ‘बॉन्ड’वर जामीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते कल्याण सिंह हे लखनऊच्या विशेष न्यायालयात हजर  झाले. यावेळी न्यायालयाने त्यांना 2 लाख रुपयांच्या  वैयक्तिक बॉन्डवर जामीन दिला. या प्रकरणात कल्याण सिंह यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कल्याण सिंह यांच्यावर कट रचणे आणि वैमनस्य फसरवण्याचा आरोप निश्‍चित करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी दररोज सुनावणी होत आहे. त्यांच्यावर कलम 153a, 153b, 295, 295a, 505 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपाच्या लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी तसेच उमा भरती यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना राम मंदिराच्या निर्माणाविषयी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आपली भूमिका न्यायालयात मांडणार असल्याचे सांगितले. ते राजस्थानचे राज्यपाल असल्यामुळे  त्यांना कलम 361 च्या अंतर्गत सूट मिळाली होती. मात्र आता त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे.

कुणाकुणावर चालू आहे खटला

सीबीआयच्या याचिकेवर 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये कल्याण सिंह यांच्यासह लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्यगोपाल दास यांच्यासह अन्य आरोपींचा समावेश होता. या सर्वांना या प्रकरणात सध्या जामीन मिळाला आहे.

काय आहे प्रकरण

6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येमध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यावेळी कल्याण सिंह हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता कि, त्यांनी बाबरी मशिदीला काहीही न होऊ देण्याचे वाचन दिले असताना देखील कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली होती. त्यानंतर त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.