सुशांतच्या नावाखाली कंगनाने सुरक्षा मिळवली, अभिनेत्री काम्या पंजाबीची टीका

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांतसिंहच्या नावाखााली कंगणा रणौतने वाय प्लस सुरक्षा मिळविली असल्याचा धक्कादायक आरोप अभिनेत्री काम्या पंजाबी हिने केला आहे. ‘जस्टिस फॉर सुशांत’ म्हणत सुरु झालेले प्रकरण आता ‘जस्टिज फॉर कंगना’वर आले आहे, असा उपरोधिक टोला तिने लगावला आहे.

 

 

 

 

 

 

 

अभिनेत्री कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. अलिकडेच तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर तिच्यावर विविध स्तरातून टीका करण्यात आली. जस्टिस फॉर सुशांत असे म्हणत सुरु झालेले हे प्रकरण आता जस्टिस फॉर कंगना आणि जस्टिस फॉर रवी किशन पर्यंत पोहोचले आहे. उद्या कोणी दुसरा येईल परवा कोणी तीसरा. गटर कोण आहे? ड्रग्स कोण घेत होते? वाय प्लस श्रेणीतील सुरक्षा कोणी घेतली? विचार करा या सर्व घडामोडिंमध्ये सुशांत कुठे आहे? अशा आशयाचे ट्विट करुन काम्याने कंगनावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, काही दिवसांपासून कंगना रणौत सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहे. ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद दिली होती. त्यानंतर कंगणाना वाय प्लस सुरक्षेच्या गराड्यात मुंबईत पोहचली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like